पुणे- आज कोंढनपुर जवळ असलेल्या राठवडे गावात रिंग रोड च्या मोजनी साठी पोलिस बंदोबस्तात गेलेल्या प्रशासन आणि पुणे जिल्हा रिंगरोड विरोधी कृती समिती,स्थानिक शेतकरी यांच्यात संघर्ष झाला.आन्दोलकांना दुपारी ताब्यात घेऊन रात्री सोडल्या नंतर आन्दोलकांनी ही माहिती माध्यमां ना दिली.आणि संघर्षाचे व्हिडिओ प्रसिद्धिसाठी शेअर केले.
कृती समिति चे म्हणणे आहे की, पुणे जिल्ह्याच्या 84 गावांमधून हा रिंग रोड जातोय. ऐन कोरोनाच्या काळात शासनाने अधिसूचना काढली, एकीकडे जिल्ह्यात ग्रामीण भागात लॉकडाउन, त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती लोकांना वेळेत हरकती-सूचना दाखल करता आल्या नाहीत. मोजणीच्या हरकती प्रांताधिकारी कार्यालय दाखल केलेल्या असतानासुद्धा, जबरदस्तीने पोलीस बळाचा वापर करून मोजणी सुरू आहे. प्रांताधिकारी, तहसिलदार गाव तलाठी सर्व चार पट पाचपट मोबदला पैसे मिळणार अशा भूल थापा शेतकऱ्यांना देत आहेत. वारंवार निवेदन देऊन सुद्धा प्रशासकीय अधिकारी आणि प्रशासनावर कुठलाही परिणाम झाला नाही म्हणून रिंगरोड विरोधी कृती समितीने प्रत्येक प्रांत अधिकारी कार्यालयाच्या बाहेर गाथा वाचून उपोषणं केली. लोकांचा उद्रेक पाहून काही काळासाठी मोजणी प्रक्रिया बंद केली. प्रत्यक्षात काही छुप्या पद्धतीने मोजण्यात चालूच ठेवल्या.