वारजे माळवाडीमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Date:

पुणे-यशवंतराव चव्हाण सेंटर जतन फाउंडेशन व खडकवासला विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटन अॅड. अशोक अढूळकर, पुणे महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, खडकवासला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष काका चव्हाण,  निवृत्ती येनपुरे, नितीन पाटील, अरुण पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

बराटे प्रॉपर्टीज व्हायोला सोसायटी गेट समोर, सिप्ला हॉस्पिटल रस्ता वारजे येथे सकाळी १० ते दुपारी ४ नागरिकांसाठी नेत्रतपासणी करण्यात आली. तज्ञ डॉक्टरांच्या वतीने नेत्र तपासणी करण्यात आली त्यासाठी अत्याधुनिक मशिनद्वारे नेत्रतपासणी करण्यात आली या तपासणी शिबाराला वारजे माळवाडी भागतील लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला यामध्ये जवळजवळ एक हजारांहून अधिक महिला, पुरुष आणि जेष्ठ नागरिकांनी तपासणी करून घेतली यामध्ये 876 जणांना उत्तम प्रतीचे चष्मे मोफत देण्यात आले. 

मानवी शरीरातील महत्त्वाचा भाग म्हणजे त्याचे डोळे आहेत त्याची निगा चांगली राखली पाहिजे त्यासाठीच लोकनेते शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही या नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन केले आहे तसेच नागरिकांचे आरोग्य महत्वाचे असून त्यांच्यासाठी नेहमीच आम्ही अशा कार्यक्रमांना प्राधान्य देत असल्याचे आयोजक बाबा धुमाळ आणि दीपाली धुमाळ यांनी सांगितले.यावेळी देवेन्द सूर्यवंशी, धनंजय म्हसे, धर्मराज हांडे महाराज, निलम डोलसकर, निवृत्ती येनपुरे शिवाजी भोईने, सुरेश जाधव, महादेव गायकवाड, प्रभावती कानगुडे, अरूण पाटील, मनिष धुमाळ, मोहित वेलाणी, आदी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. सलील कुलकर्णी यांचा पहिल्या संगीतकार यशवंत देव पुरस्काराने गौरव

संगीत ही आराधना; जीवनातील अखंड काव्य : प्रकाश जावडेकर पुणे...

पुणेकरांना अपेक्षित असाच गणेशोत्सव करू : मुरलीधर मोहोळ

गणेशोत्सव हा पुणेकरांचा लोकोत्सव; लोकसहभाग अधिक व्यापक करण्याची ग्वाही ‘गणेशोत्सव...

IIT Bombay मधील विद्यार्थी साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणी मुंबई काँग्रेसचे तीव्र आंदोलन.

IIT Bombay मधील जाति-आधारित छळाच्या आरोपांची सखोल चौकशी करा,...

मिरवणुकीचा खर्च टाळला; गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिला निधी

शिवाजीनगर गावठाणातील श्री सद्गुरु मित्र मंडळाचा आदर्श गणेशोत्सव; उर्वरित...