मराठी मनोरंजन विश्वातील ग्लॅमडॉल, सोनाली कुलकर्णी सगळ्यांचीच लाडकी आहे. उत्तम अभिनय आणि अप्रतिम डान्स ही सोनालीची खासियत आहे. या गुणांच्या जोरावर सोनालीने तिची वेगळी छाप पाडलेली आहे. तिला लाघवी सौंदर्य सुद्धा लाभलेलं आहे. तिचा उत्तम फॅशन सेन्स, तिचं जातीचं सौंदर्य वाढवण्याचं काम करतो. सोनाली वेगवेगळ्या स्टाईल स्टेटमेंट्सचा वापर करत असल्याने, तिचे नवे ग्लॅमरस लुक पाहायला मिळतात. ‘झी युवा’ वाहिनीवर सध्या सुरु असलेल्या, ‘युवा डान्सिंग क्वीन’ या कार्यक्रमात, दर आठवड्यात सोनालीचा नवा लुक पाहायला मिळतो. ‘युवा डान्सिंग क्वीन’मधील तिचा पेहराव, थीमला साजेसा आणि आकर्षक असतो. अनेक सौंदर्यवतींचा सहभाग असलेल्या या मंचावर सोनालीच्या फॅशनचा खास प्रभाव पडतो!!!
साध्या कुर्तीपासून ते साडीपर्यंत किंवा अगदी वेस्टर्न आऊटफिटपर्यंत, सगळ्या प्रकारचे पेहराव तिच्या सौंदर्यात भरच घालतात. तिच्या या स्टाईल स्टेटमेंटबद्दल विचारले असता ती म्हणाली;
“हॉलिवूड आणि बॉलीवूडमधील अनेक सौंदर्यवतींचं स्टाईल स्टेटमेंट बघून मी प्रभावित होते. नव्वदच्या दशकात जन्मलेल्या आम्हा मुलांवर ‘फ्रेंड्स’ या मालिकेचा प्रभाव होता. त्यामुळे जेनिफर माझी सगळ्यात फेवरेट आहे. तिने साकारलेल्या भूमिकेची फॅशन बघून मी खूपच प्रभावित होत असे. पण, फॅशनच्या बाबतीत, आदर्श व्यक्तीचे अनुसरण करण्याचे मी टाळते. अनुसरण करण्याच्या नादात त्या व्यक्तीची नक्कल आपण करू लागतो. मला कुणाचीही नक्कल करायला आवडत नाही. ट्रेडिशनल आणि वेस्टर्न असे दोन्ही प्रकार मला आवडतात. खास दिवसांचे निमित्त साधून उत्तम पेहराव करायला मला आवडते. कपडे परिधान करत असताना, आपल्या शरीराचा बांधा कसा आहे, याचा सुद्धा विचार होणे गरजेचे आहे. फॅशन सांभाळताना, पेहराव आपल्यासाठी सोयीचा सुद्धा असायला हवा. ती खबरदारी सुद्धा मी घेते.”
सोनालीचे नवनवीन स्टाईल स्टेटमेंट जाणून घेण्यासाठी पाहत रहा, ‘युवा डान्सिंग क्वीन’, बुधवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता, फक्त आपल्या लाडक्या ‘झी युवा’ वाहिनीवर!!!