पुणे – . गॅसचे दर कमी केले नाहीत तर आमचे पुढचे लक्ष्य हे पेट्रोलपंपावर लावलेले पंतप्रधान मोदीजींचे फ्लेक्स असेल, इतकं लक्षात असू द्या. असा इशारा देत पुण्यातील मंडई येथे महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चूल पेटवून दर वाढीचा निषेध नोंदविला. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने आज राज्यभरात केंद्रसरकारने केलेल्या गॅस सिलेंडर दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
या संदर्भात रुपाली चाकणकर यांनी सांगितले कि , हे आंदोलन राज्यभर सुरु आहे. मागील १५ दिवसांमध्ये केंद्रातील भाजपा सरकारने एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये १०० रुपयांनी वाढ केली आहे. मागील एक वर्षामध्ये करोना कालावधीत लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालाय, अर्थव्यवस्था कोलमडली आहे. अशी परिस्थिती असताना केंद्र सरकार देशातील सामान्य नागरिकांना स्वस्त दरांमध्ये स्वयंपाकासाठी वापरला जाणार एलपीजी गॅस आणि इंधन उपलब्ध करुन दिलासा देणारा निर्णय घेण्याऐवजी असंवेदनशीलता दाखवत दरवाढ करत आहे. गॅसचे दर कमी केले नाहीत तर आमचे पुढचे लक्ष्य हे पेट्रोलपंपावर लावलेले पंतप्रधान मोदीजींचे फ्लेक्स असेल, इतकं लक्षात असू द्या.यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.