पुणे, ता. ११ : समाजातील प्रत्येक व्यक्ती समान पातळीवर येण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी व्यक्त केले.
डीर्इएस फर्ग्युसन महाविद्यालयात ‘सूक्ष्म’ या मायक्रोबायलॉजी क्लबचे उद्घाटन करताना गंगाखेडकर बोलत होते. प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी, उपप्राचार्या प्रा. स्वाती जोगळेकर, विभाग प्रमुख डॉ. मेघना कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी क्विझ, पोस्टर डिझायनिंग आणि मॉडेल मेकिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
गंगाखेडकर म्हणाले, केवळ पैसा आणि प्रसिद्धी यांच्या मागे न लागता, समाजाचा विचार केला पाहिजे. समानतेसाठी केलेले प्रयत्न अधिक समाधान मिळवून देतात. प्रत्येक जण समान पातळीवर आला तर संपूर्ण जग अधिक चांगले होण्यास मदत होईल.
डॉ. परदेशी यांनी प्रास्ताविक, कीर्तना अय्यपन आणि अंशुमन झा यांनी सूत्रसंचालन, श्लाघा मगोन यांनी परिचय, डॉ. मंडवी गुर्जर यांनी पारितोषिक विजेत्यांची नावे जाहीर केली आणि डॉ. कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.