पुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व शाहीर आण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. शाळेमध्ये बाल सभेचे आयोजन करण्यात आले .या सभेचे संपूर्ण कामकाज विद्यार्थ्यांनीच पार पडले. अध्यक्ष म्हणून इयत्ता चौथी शिवनेरी वर्गातील कु.सानिया भंडारे ,लोकमान्यांच्या वेशभूषेत चि.गणेश पासलकर व अण्णा भाऊ साठे यांच्या वेशभूषेत कु.गौरी पुंडे हे विद्यार्थी आले होते.
बाल सभेचे औचित्य साधून शाळेत चालू असलेल्या स्वस्तिक पथकातील बालव्यवस्थापकांचा शपथविधी आज घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन माननीय मुख्याध्यापिका सौ कल्पना वाघ , कार्यक्रमाचे अध्यक्ष व ज्येष्ठ शिक्षक यांच्या हस्ते झाले. त्यानंतर कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक माननीय मुख्याध्यापिका सौ कल्पना वाघ यांनी केले . विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळकांचे दहा गुण बाईंनी सांगितले .शाहीर अण्णाभाऊ साठे यांची माहिती चि. हर्षवर्धन मुळीक याने सांगितली. त्यानंतर लोकमान्य टिळक व शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याविषयी भाषणे विद्यार्थ्यांनी केली .लोकमान्यांच्या वेशभूषेतील चि.गणेश पासलकर याने अवांतर वाचन व व्यायामातून शरीर व मन बळकट करा असा संदेश दिला .अध्यक्ष भाषणात लो.टिळक व अण्णा भाऊ साठे यांचे प्रेरणादायी विचार मांडले.इयत्ता चौथी शिवनेरी वर्गातील विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक स्तवन सादर केले. ज्येष्ठ शिक्षिका सौ.तनुजा तिकोने यांनी बालसभा आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शाबासकी दिली.
लोकमान्य टिळकांची अधिक माहिती मिळवण्यासाठी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी आजच्या दिवशी नारायण पेठेतील केसरीवाड्यास भेट दिली .यावेळी तेथे माननीय मुख्याध्यापिका सौ कल्पना वाघ व ज्येष्ठ शिक्षक सौ तनुजा तिकोने, सौ.जयश्री खाडे, व धनंजय तळपे यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला .
या बालसभेचे सूत्रसंचालन चि.गंधार दांडेकर,पाहुण्यांचा परिचय चि.अन्वय जोगळेकर,आभार कु अनन्या बर्वे या विद्यार्थ्यांनी केले .विशेष म्हणजे सभेसाठी फलक लेखन कार्यक्रम पत्रिका बैठक व्यवस्था रांगोळ्या इत्यादी सर्व सभेची तयारी विद्यार्थ्यांनीच केली होती .अशा प्रकारे शाळेत बाल सभेचे आयोजन आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.