पुणे- पद्मश्री इलेक्ट्रॉनिक्स चे संचालक शिरीष देशमुख हे गेली ३० वर्षे भारताच्या संरक्षण खात्यासाठी लागणाऱ्या विविध उपकरणांची निर्मिती करत आहेत. त्यातही त्यांनी नवीन उपकरणे विकसित करण्यावर , तसेच आयात पर्यायी प्रणाली विकसित करण्यावर विशेष भर दिलेला आहे हे कार्य स्पृहणीय असून त्यांचे कार्य केवळ कोथरूड किंवा पुण्यासाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे असे गौरवोद्गार आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले.शिरीष देशमुख यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी चंद्रकांतदादांनी त्यांची भेट घेतली व पुणेरी पगडी,शाल व गुच्छ देउन त्यांच्या कार्याचा गौरव केला.यावेळी त्यांच्या समवेत भाजप प्रवक्ता संदीप खर्डेकर,नगरसेवक दीपक पोटे,नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,भाजप कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी,युवा मोर्चा सरचिटणीस दीपक पवार उपस्थित होते.
शिरीष देशमुख यांनी Computerized engine testing system, engine governors,
नाग व आकाश मिसाईल साठी इलेक्ट्रॉनिक्स फॉर सेफ्टी आर्मिंग मेकँनिझम,
इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टिम फॉर रेल मोबाइल व अग्नी मिसाईल साठी चे रोड मोबाइल लाँचर्स व चेक आउट सिस्टिम, ८४ मि मी रॉकेट लाँचर्स साठी रिमोट आँपरेटेड प्लँटफाँम, अश्या अनेक सिस्टिम्सची निर्मिती यशस्वीपणे केली असून त्यांच्या सिस्टिम्स भारताच्या सीमेवर कार्यरत आहेत.साधे , सरळ, सोपे पर्याय देण्याकडे त्यांचा कल असून त्यांनी तयार केलेल्या सिस्टम्स या सैन्य दलाला लागणाऱ्या कठोर चाचण्या यशस्वी पणे कार्यरत आहेत.
त्यांनी अग्नी मिसाईल च्या चाचण्यांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला असून, अब्दुल कलाम बेटावर (पूर्वी चे व्हिलर आयलंड) अनेक काळ वास्तव्य केले आहे.
ते स्वतः इलेक्ट्रॉनिक्स पदवीधर इंजिनिअर आहेत आणि नवीन पिढीने या क्षेत्रात काम करावे या साठी प्रोत्साहन व मार्गदर्शन करत आहेत.अश्या व्यक्तीमत्त्वाचा सत्कार करताना मी स्वतःला भाग्यशाली समजतो असे ही आ.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.