Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

शिल्पा तुळसकर एका नवीन आगळ्या-वेगळ्या भूमिकेत

Date:

मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाचे ठसे उमटवत कधी सुजाता तर कधी देवकीची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारं हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणजे अभिनेत्री शिल्पा तुळसकर. २२ सप्टेंबर २०१७ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या ‘अनान’ चित्रपटातून त्यांचं एक नवीन रूप आपल्याला पाहायला मिळणार आहे.
देवकी, डोंबिवली फास्ट, कालचक्र आणि आता बॉईज यांसारखे चित्रपट असो, लेडीज स्पेशल, दिल मिल गए, देवों के देव- महादेव यांसारख्या मालिका असो वा जावई माझा भला, लहानपण देगा देवा यांसारखी नाटके असोत सिनेमा, मालिका आणि नाटक या तीनही क्षेत्रात आपल्या उत्तोमोत्तम अभिनयाने नेहमीच स्वतःला सिद्ध करत, आपल्या भूमिकेला योग्य तो न्याय मिळवून देण्याचं काम शिल्पा तुळसकर यांनी वेळोवेळी केलेले आहे. आता ‘अनान’ या आगामी मराठी चित्रपटातून ६४ कलांचं महत्त्व जगाला पटवून देणाऱ्या या भारत देशातील संगीताची संस्कृती पिढ्यांपिढ्या पुढे सुरु ठेवणाऱ्या पंडीत वसुंधरा या भूमिकेत त्या आढळून येणार आहेत.
इस्लामी संस्कृतीकडून भारतीय संगीतास मिळालेल्या सुगम संगीताची देणगी म्हणजेच ‘गझल’… आपलं संपूर्ण आयुष्य कलेला वाहून देणाऱ्या  गझल गायिकेची भूमिका शिल्पा तुळसकर या चित्रपटात साकारत आहेत. त्यांच्या अभिनयाच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत प्रथमच त्या अशा भूमिकेत दिसणार आहेत. अस्खलित उर्दू भाषेचा वापर, घरंदाज गायिकेची शैली आणि तिच्यात लपलेली एक प्रेमळ आई आणि अबोल प्रेमिका यांचं मिश्रण असलेली ही वसुंधरा पाहण्यास एक वेगळीच उत्कंठता निर्माण झालेली आहे.
 ‘रोहन थिएटर्स’ च्या रौनक भाटीया आणि हेमंत भाटीया यांनी ‘अनान’ या चित्रपटाची निर्मिती केलेली असून कथा आणि क्रिएटीव्ह डायरेक्शन हेमंत भाटिया यांचं आहे. दिग्दर्शन राजेश कुष्टे यांनी केलेलं आहे तर पटकथा–संवाद राजेश कुष्टे आणि मुकेश जाधव यांनी लिहिले आहेत. चित्रपटाचं संकलन सेजल पेंटर यांनी केलं असून छायाचित्रण राज कडूर यांनी केलं आहे.
येत्या २२ सप्टेंबर ला ‘अनान’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कुंडमळा येथे वेगवान बचावकार्यामुळे ५१ पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश

पुणे, दि. 16: मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी (दि....

श्रुती अगरवाल यांची संचालकपदावर पदोन्नती

नवी दिल्ली, भारत, 16 जून 2025: प्रगत प्रक्रिया पाइपिंग सेवा पुरवणारी आघाडीची कंपनी डी...

स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंटस् असोसिएशनतर्फे पुरस्कार जाहीर 

व्यापारी एकता दिनानिमित्त पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन ; राजस्थानचे...