राष्ट्रवादी लबाड आणि फसविणारा पक्ष -अखेर हर्षवर्धन पाटलांनी चढविला हल्ला

Date:

इंदापूर- . “लबाड राष्ट्रवादीने शब्द देऊन फसवलं, आघाडीचा धर्म पाळूनही राष्ट्रवादीने अन्यायच केला. आमच्या सभ्यपणाचा फायदा राष्ट्रवादीने घेतला”, अशा शब्दात हर्षवर्धन पाटलांनी मनातली खदखद व्यक्त केली आहे. दहा तारखेनंतर ते पक्षांतराची घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेश जवळ-जवळ निश्चित मानला जातोय. कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यासाठी त्यांनी इंदापूरमध्ये मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीवर त्यांनी सडकून टीका केली

“सगळ्या जनतेच्या ज्या भावना आहेत, त्याच माझ्या भावना आहेत. तुमच्या भावनांचा आदर केला जाईल. ज्याचं जळतं त्याला कळतं, म्हणून आता पुढचा निर्णय घ्यावा लागेल”, असे म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी पक्षांतराचे अप्रत्यक्ष संकेत दिले. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीसाठी प्रामाणिकपणे काम केले, पण काय मिळालं, असा सवाल त्यांनी व्यथित होऊन विचारला. मेळाव्यापूर्वी हर्षवर्धन पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली होती.

“लोकसभेच्या वेळी हर्षवर्धन पाटील हे सुप्रिया सुळेचे काम करतील मात्र तीन महिन्यांनंतर विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांचे काम त्यांना करावे लागेल, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पुण्यात सुप्रिया सुळे यांना बजावलं होतं, मग त्याचं काय झालं?” असा सवाल पाटील यांनी विचारला. “तुम्ही जर काँग्रेसला जागा सोडणार होतात, मग शिवस्वराज्य यात्रा इंदापुरात का आली? दौऱ्यात इंदापूर नव्हते मग कसे का आलात? आता यापुढे लबाड माणसांसाठी काम करायचं नाही”, असेही त्यांनी यावेळी बोलून दाखवले.

“माझ्या पुस्तक प्रकाशनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन तासांचा वेळ दिला, पीएला सांगून कॅबिनेट बैठक रद्द करून प्रकाशनाला आले, एकीकडे शब्द पाळणारे हे लोक तर दुसरीकडे दगा देणारे”, असे म्हणत हर्षवर्धन पाटलांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. यावेळी, हर्षवर्धन पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, अशा जोरदार घोषणा दिल्या जात होत्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कोलंबो परिषदेसाठी काँग्रेसचे नगरसेवक सुनील शिंदे यांची निवड!

पुणे- महापालिकेतील कॉंग्रेसचे नगरसेवक आणि कामगार नेते सुनील...

राज्यात 1 ते 15 मे 2026 या कालावधीत स्व-गणना, तर घरोघरी जाऊन घरांची यादी आणि गृहगणना 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान होणार

मुंबई, महाराष्ट्र जनगणना संचालन संचालनालयाने आज मुंबईत पत्रकार परिषदेचे आयोजन...

येरवड्यातील लुंबिनी उद्यानात भीमगीतांची ‘धम्म संध्या’ उत्साहात संपन्न

बुद्ध जयंतीनिमित्त माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका नंदिनी...

परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय

जिल्हा परिषद सेवकांची सहकारी पतसंस्था:चेअरमन पदासाठी प्रदीप गोलांडे आणि...