कोरोना नियमाचे पालन करून राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू होणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची परवानगी

Date:

मुंबई-कोरोना नियमांचे पालन करुन राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरु सुरु होणार आहे. कोरोनाची स्थिती सामान्य झाल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळणार आहे.

मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून राज्यातील सर्व शाळा बंद होत्या. पहिली लाट ओसरल्यानंतर काही इयत्ता, वर्ग सुरु झाले होते. पण दुसऱ्या लाटेनंतर पुन्हा वर्ग बंद झाले होते. दरम्यान, बहुतांश ठिकाणी लसीकरण झाले आहे. शिक्षक आणि शालेय कर्मचारी यांचे लसीकरण झालेले आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

जिल्हानिहाय कोरोनाची स्थिती पाहून जिल्हाधिकारी निर्णय घेऊन शाळा सुरु करण्याबाबत निर्णय होईल, असे सांगितले जात आहे. कोणत्या वर्गांच्या शाळा सुरु होणार यासंदर्भात अद्याप सविस्तर माहिती समोर आली नाही.

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यंदाही ऑनलाइन पद्धतीनेच शैक्षणिक वर्ष सुरू करावे लागले. मात्र ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शाळा सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण काहीसे कमी होत असल्याने, सर्व नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याचे दिसत आहे. तर, शाळा कुठल्या वर्गांची व कशा पद्धतीने, कोणत्या वेळेत सुरू होतील.. याबाबतची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) घेतलेल्या सर्वेक्षणात ८१.१८ टक्के पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास तयार असल्याचा निष्कर्ष दिसून आला. त्यामुळे करोनाचा प्रभाव कमी असलेल्या भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास ७ जुलैला मान्यता देण्यात आली होती.  त्यानुसार राज्यातील बहुतांश जिल्ह्य़ांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. त्यानंतर पाचवी ते सातवीचे वर्ग  १७ ऑगस्टपासून सुरू करण्यास  सुरू करण्यासही शिक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे मान्यता दिली होती.

 शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या असून, महापालिका क्षेत्रासाठी आयुक्तांच्या, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत स्तरासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्याच्या, शिक्षकांचे लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

देशभर पावसाचा कहर; वसईत रस्त्याला नदीचे रूप, २० कार पाण्याखाली

गुजरातमध्ये कॉलनीत चालली बोट; १३ राज्यांना मुसळधार पाऊस आणि...

भारत–जपान तंत्रज्ञान सहकार्याला पुण्यात नवी गती; पुढील पाच वर्षांत १,००० हून अधिक आयटी रोजगारांची संधी

पुणे | प्रतिनिधी पुणे शहर भारत–जपान तंत्रज्ञान सहकार्याचे महत्त्वपूर्ण केंद्र...

पावसाळी गटारे म्हणजे शहराची जीवनवाहिनी… ती बंद झाली की रस्तेच बनतात तलाव!

ऑपरेशन पावसाळी गटारे – भाग २ ड्रेनेज वेगळे... पावसाळी गटारे...