एसबीआयने ग्राहकांसाठी सर्वसमावेशक डिजिटल सुरक्षाविषयक मार्गदर्शक तत्वे जारी केली असून त्यामध्ये डिजिटल व्यवहार सुरक्षित पद्धतीने करण्यासाठी काय करावे किंवा काय करू नये याविषयीच्या सूचनांचा समावेश आहे.
डिजिटल बँकिंग, डिजिटल व्यवहार, इलेक्ट्रॉनिक पेमेंट्स आणि सोशल मीडिया सिक्युरिटीशी संबंधित ग्राहकांनी पुढील बाबी लक्षात ठेवाव्यात –
लॉगिन सिक्युरिटी:
· अनोखे आणि गुंतागुंतीचे पासवर्ड वापरण्याचा प्रयत्न करतील
· पासवर्ड वारंवार बदलण्याचे लक्षात ठेवा
· युजर आयडी, पासवर्ड किंवा पिन कधीही जाहीर करू नका, साठवून ठेवू नका किंवा लिहून ठेवू नका.
· लक्षात ठेवा, बँक युजर्सना कधीही त्यांचा युजर आयडी/पासवर्ड्स/कार्ड क्रमांक/पिन/पासवर्ड्स/सीव्हीही/ओटीपी
· तुमच्या उपकरणातून ‘ऑटो सेव’ किंवा ‘रिमेम्बर’ फंक्शन डिसेबल करा आणि युजर आयडी व पासवर्ड स्टोअर करण्यापासून प्रतिबंध करा.
इंटरनेट सुरक्षा
· बँकेच्या संकेतस्थळाच्या अड्रेस बारमध्ये कायम “https” आहे की नाही तपासा.
· सार्वजनिक ठिकाणी ओपन वाय- फाय नेटवर्क वापरून ऑनलाइन बँकिंग व्यवहार करणे टाळा.
· काम झाल्यानंतर कायम लॉगआउट करा आणि ब्राउजर बंद करायला विसरू नका.
युपीआय सिक्युरिटी
· मोबाइल पिन आणि युपीआय पिन वेगवेगळे ठेवण्याचा प्रयत्न करा.
· अनोळखी युपीआय रिक्वेस्टला प्रतिसाद देऊ नका.
· संशयास्पद रिक्वेस्टला प्रतिसाद देऊ नका.
· पिनची गरज केवळ रकमेचे हस्तांतर करताना असते, रक्कम मिळवताना नाही.
· जर तुमच्या माहितीशिवाय तुमच्या खात्यावरून कोणत्याही प्रकारचा व्यवहार झाल्यास युपीआय सेवा तत्काळ डिसेबल करा.
डेबिट/ क्रेडिट कार्ड सिक्युरिटी –
· एटीएम मशिन्स किंवा पीओएस उपकरणांद्वारे एटीएम व्यवहार करताना आजूबाजूच्या परिस्थितीबाबत सावधान राहा.
· पिन एंटर करताना कीपॅड कव्हर करा.
· व्यवहार करण्यापूर्वी ई- कॉमर्स संकेतस्थळाची अधिकृतता तपासा.
· ऑनलाइन बँकिंगद्वारे डेबिट कार्ड व्यवहारांचे व्यवस्थापन करा.
· ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, पीओएस आणि एटीमद्वारे कार्डाचे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यवहार करताना मर्यादा निश्चित करा.
मोबाइल बँकिंग सिक्युरिटी –
· फोन/लॅपटॉप्स/टॅब्लेट्सवर स्ट्राँग पासवर्ड्स/बायोमेट्रिक परमिशन अनेबल करा.
· मोबाइल पिन कोणालाही सांगू नका.
· शक्य तिथे बायोमेट्रिक ऑन्थेटिकेशन वापरा.
· अज्ञात व्यक्तीने सुचवलेले कोणतेही अनोळखी अप डाउनलोड करू नका.
· केवळ अधिकृत स्टोअर्सद्वारे अप्लिकेशन डाउनलोड करा.
· मोबाइलवरील महत्त्वाच्या अप्सच्या परमिशनवर नियमितपणे देखरेख करा आणि अनावश्यक तसेच वापरल्या न जाणाऱ्या अप्सवर लक्ष ठेवा.
· सार्वजनिक वायरलेस नेटवर्कशी फोन कनेक्ट करणे टाळा.
सोशल मीडिया सिक्युरिटी
· तुम्ही ज्या व्यक्तीशी संवाद साधत आहात त्यांची ओळख तपासा.
· कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वैयक्तिक/आर्थिक माहिती देऊ नका.
· सार्वजनिक ठिकाणी किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर गोपनीय माहितीविषयी चर्चा करू नका.
संकेतस्थळाची लिंक