शायरी प्रेमींसाठी “इर्शाद”अँप -सई ताम्हणकर ने केले अनावरण
पुणे:-आतापर्यंत आपण शायरी बऱ्याच वेळा चित्रावर किंवा विविध वेब साईड वर पहिल्या असतील पण आता बीड मधील एका तरुणाने तरुणाईसाठी शायरी चे नवीन “इर्शाद”अँप तयार केले आहे.
सध्याच्या तरुणाईला उत्तम अशी शायरी सहज उपलब्ध व्हावी तसेच शायरीतील अवघड शब्द आणि त्याचा अर्थ सहजच या पिढी पर्यंत पोहचावा आणि नवोदित शायर फॅन साठी श्रीपाद अनंत भोळे यांनी हे अँप चे अनावरण अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या हस्ते निळू फुले सभागृह सांगवी येथे करण्यात आले.
यावेळी सई ताम्हणकर म्हणाल्या ,आताच्या पिढीला शायरी हा अत्यंत आवडता विषय आहे व शायरी कळणे तितकेच गरजेचे आहे.बहुतांश शायरी मध्ये उर्दू भाषेचा जास्त वापर केला जातो.पण सध्याच्या तरुणाईला तो अर्थ लक्षात येत नाही .त्यामळे ह्या अँप च्या माध्यमातून तरुणाईला शायरीचा अर्थ कळेल व त्यांच्यामधील नवोदित शायर तयार होतील.
श्रीपाद अनंत भोळे हा तरुण माजलंगाव जिल्हा बीड येथे राहणार असून शिक्षण बी. ई कॉम्पुटर हे झाले आहे.आतापर्यंत त्याने शहिदांच्या जीवन परिवाराच्या दुःखावर प्रकाश टाकणारा लघुपट केला आहे.तसेच 3पी एम टू 3 ए एम -नोवेल -12 तासांची प्रेमकथा केला आहे.गीतकार म्हणून “ताटवा”फिल्म मध्ये गीत गायले आहे.2018 मध्ये दादा साहेब फाळके गोल्डन कॅमेरा फिल्म फेस्टिव्हल मध्ये बेस्ट लिरिस्ट म्हणून नॉमिनेशन सुद्धा मिळाले आहे.
हे अँप अँड्रॉइड आणि आय ओ एस ह्या प्रकारचे अँप आहे.कोणतीही व्यक्ती हे अँप डाउनलोड करू शकते.त्यासाठी कोणतीही फि नाही.हे अँप विनामूल्य आहे जास्तीत जास्त शायरी प्रेमीं नी ह्या अँप चा वापर करावा असे आवाहन श्रीपाद भोळे यांनी कार्यक्रमात केला.