पालीच्या नगराध्यक्ष गीता पालरेचा यांच्यासह ३४ ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच आदींचा भाजपात प्रवेश

Date:


मुंबई, दि. २८- नोव्हेंबर-रायगड जिल्ह्यातील पाली सुधागड तालुक्यामधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी नगराध्यक्ष व पालीच्या नगराध्यक्ष गीता पालरेचा यांच्यासह ३४ ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्यासह, ३ नगरसेवक आदींनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे जिल्ह्यामध्ये भाजपची संघटनात्मक ताकद अधिक वाढली आहे. रायगडमध्ये भाजपा पक्ष एक नंबरचा कसा होईल यासाठी त्या नक्कीच प्रयत्नशील राहतील आणि त्यांच्याबरोबर भाजपात प्रवेश केलेले त्यांचे सहकारीही रागयड जिल्हयातील प्रचंड ताकद आहे, त्यामुळे रायगड जिल्हा शतप्रतिशत भाजपमय होईल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज व्यक्त केला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व पाली सुधागड तालुक्यातील पाली नगरपंचायतच्या नगराध्यक्ष गीता पालरेचा यांच्यासह, रमेश साळुंखे, अभिजीत चांदोरकर, संजय घोसाळकर, प्रकाश अवास्कर, नितीन परब, शाम खंडागळे, सुधाकर मोरे, सुशिल शिंदे, मारुती खेरटकर ३४ ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्यासह, ३ नगरसेवक,राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्ष प्रवेश कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर, सरचिटणीस विक्रांत पाटील,दक्षिण रायगड भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा आदी उपस्थित होते.

याप्रसंगी प्रसिध्दीमाध्यामांशी बोलताना मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, आज भाजपात आलेली ही सर्व मंडळी त्या त्या क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्षे चांगलं काम करीत आहेत. गीता पालरेचा या राष्ट्रवादी काग्रेस पक्षाच्या पालीच्या नगराध्यक्षा होत्या. परंतु त्यांनी आपल्या पक्षाचा व पदाचा त्याग करुन भाजपामध्ये प्रवेश केला. एखाद्या पदावरती एखादा व्यक्ती विराजमान असताना ती व्यक्ती पदाच्या लालसेपाटी त्याठिकाणी चिकटून राहते. परंतू गिता ताईंनी सर्वच कार्यकर्त्यांसाठी वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यांना राजकीय प्रवासामध्ये जेव्‍हा भाजपात प्रवेश करायचा होता, त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा पदाचा त्याग केला आणि नवीन पक्षामध्ये प्रवेश करणे ही क्वचितच घडलेली घटना असावी असेही त्यांनी सांगितले.
सुधागड तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुक्याचे अध्यक्ष रमेश साळुंखे, अभिजीत चांदोरकर, संजय घोसाळकर, प्रकाश अवास्कर, नितीन परब, शाम खंडागळे, सुधाकर मोरे, सुशिल शिंदे, मारुती खेरटकर आदी अनेक पदाधिका-यांनी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.
मुख्यमंत्री एकनाथ‍ शिंदे व व आपल्या सर्वांचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जनतेच्या हिताचं सरकार या महाराष्ट्रामध्ये विराजमान झालेले आहे. त्यामुळे, सुधागड तालुक्यामधील सर्व प्रश्न खऱ्या अर्थांने मार्गी लावण्यासाठी या प्रवाहामध्ये त्यांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी विश्वास दाखवून विकासाच्या दिशेने हा प्रवास सुरु केल्याचे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रांगोळ्यातून उलगडले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य 

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

हडपसरमध्ये रक्ताच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांना नवी दिशा: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी ऑटोलॉगसस्टेमसेल प्रत्यारोपण

नियमित आरोग्य तपासणीतून रक्ताच्या कर्करोगाचे निदान; मेकॅनिकल इंजिनिअरने केली कर्करोगावर यशस्वी मात पुणे, 26 जून 2026: हडपसर येथे राहणारे 46 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर ऋतिक मेहरा यांच्यासाठी जानेवारी 2026 मधील नियमित वार्षिक आरोग्य तपासणी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कोणतीही लक्षणे नसताना आणि नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच त्यांच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत त्यांना IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा या अस्थिमज्जेतील प्लाझ्मा पेशींमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा हा प्लाझ्मा पेशींचा (Plasma Cells) एक प्रकारचा कर्करोग आहे, ज्यामध्ये शरीरातील असामान्य प्लाझ्मा पेशी लॅम्बडा लाईट चेन (Lambda Light Chain) नावाचे मोनोक्लोनल प्रोटीन जास्त प्रमाणात तयार करतात। सामान्यतः आपल्या शरीरातील प्लाझ्मा पेशी संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवतात, परंतु या आजारात त्या निकामी आणि हानिकारक प्रोटीन्स बनवू लागतात.  "उपचारांपेक्षा कर्करोगाचे निदान स्वीकारणे माझ्यासाठी अधिक कठीण होते," असे ऋतिक मेहरा यांनी सांगितले. "मी पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत होतो आणि मला कोणतीही लक्षणे नव्हती. नियमित आरोग्य तपासणीतून अचानक कर्करोग झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसला. मात्र माझ्या पत्नीने संपूर्ण काळात मला सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. उपचार आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाची प्रक्रिया माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुरळीत झाली आणि आता मी हळूहळू माझ्या दैनंदिन आयुष्यात परतत आहे." निदानानंतर ऋतिक यांनी केमोथेरपीच्या तीन सायकल्स पूर्ण केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत रुग्णाच्याच स्टेम सेल्सचा वापर करून उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर रक्तपेशींची निर्मिती पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.  त्यांना 15 मे 2026 रोजी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर – मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर, पूर्वी संकलित केलेले त्यांचे स्टेम सेल्स 16 मे 2026 रोजी पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि उत्कृष्ट प्रकृतीसह त्यांना 2 जून 2026 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाविषयी बोलताना डॉ. चंद्रकांत लहाणे, सल्लागार हिमॅटॉलॉजिस्ट व हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, म्हणाले, "मल्टिपल मायलोमा हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीमुळे या रुग्णामध्ये आजाराचे लवकर निदान होऊ शकले. पात्र रुग्णांमध्ये ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण हा मल्टिपल मायलोमावरील अत्यंत प्रभावी उपचार पर्याय असून, यामुळे दीर्घकालीन चांगले परिणाम आणि अधिक सखोल रेमिशन मिळण्यास मदत होते." ही केस रुग्णालयासाठीही महत्त्वपूर्ण ठरली असून, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हडपसर, मगरपट्टा, खराडी, वानवडी, हांडेवाडी, सासवड, बारामती, अकलूज, सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक रक्ताच्या कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. इंडियन सोसायटी फॉर ब्लड अँड मॅरो ट्रान्सप्लांटेशन (ISBMT) च्या माहितीनुसार, भारतात 1983 ते 2022 या कालावधीत 26,843 बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. मात्र, दरवर्षी सुमारे 39,000 रुग्णांना या उपचारांची आवश्यकता असतानाही प्रत्यक्षात केवळ सुमारे 2,000 प्रत्यारोपणेच केली जातात. या सेवांच्या विस्ताराविषयी बोलताना डॉ. शशिकांत आपटे, संचालक – हिमॅटॉलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड, म्हणाले, "अधिकाधिक रुग्णांना त्यांच्या घराजवळ वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रादेशिक स्टेम सेल प्रत्यारोपण केंद्रे बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. हडपसर येथे ही सेवा सुरू होणे हे अत्याधुनिक हिमॅटॉलॉजी उपचार अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे." श्री. सगीर सिद्दीकी, प्रादेशिक संचालक – पश्चिम विभाग, मणिपाल हॉस्पिटल्स, म्हणाले,...

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....