Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

संकेत सरगरने कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत आपल्या कामगिरीचा उमटवला ठसा

Date:

 नवी दिल्ली – सांगलीच्या संकेत सरगरने कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. बर्मिंगहम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी संकेतने भारताला पहिलं पदक जिंकून दिलं आहे.

५५ किलो वजनी गटात संकेत महादेव सारगरने रौप्य पदक जिंकलं आहे. त्याच्या यशाने कुटुंबाला आभाळ ठेंगणं झालं आहे तर सांगलीसह महाराष्ट्राची छाती अभिमानाने फुलली आहे. पण त्याच्या यशाला गरिबीची, घरच्या अठरा विश्व दारिद्र्याची झालर आहे. घरची गरिबीची परिस्थिती असल्याने त्याला आपल्या वडिलांच्या पानाच्या टपरीवर बसावं लागत असे. पण त्याने आपल्या गरिबीला कधी कारण बनलं नाही. मध्यमवर्गीय परिस्थितीला कधी आपल्या ध्येयाच्या आड येऊ दिलं नाही. पानाच्या टपरीवर बसून त्याने सुवर्णपदकाचं स्वप्न पाहिलं. त्यादृष्टीने जिद्दीने कष्ट केले. आज त्याचं सुवर्णपदकाचं स्वप्न थोडक्यात हुकलं असलं तरी भारतासाठी पहिलं रौप्यपदक जिंकवून त्याने देशाची मान अभिमानाने ताठ केली आहे.इंग्लंडच्या बर्मिंगहॅममध्ये खेळल्या जाणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्स २०२२ स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे. आज दुसऱ्या दिवशी सांगलीच्या संकेत सरगरने भारताला पहिलं पदक जिंकून दिलं आहे. ५५ किलो वजनी गटात संकेत महादेव सारगरने रौप्य पदक जिंकले. संकेत सरगरने दोन फेऱ्यांमध्ये 6 प्रयत्नांत पूर्ण ताकद पणाला लावली आणि एकूण 228 किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले. मूळचा सांगलीचा असलेल्या संकेतने यावेळी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलीच, पण चमकदार कामगिरी करून लोकांची त्याने मनंही जिंकली. त्याने पहिल्या फेरीत म्हणजे स्नॅचमध्ये सर्वोत्तम 113 वजन उचलले. यानंतर त्याने दुसऱ्या फेरीत म्हणजेच क्लीन अँड जर्कमध्ये १३५ वजन उचलून पदक जिंकले. गेल्या वर्षी चॅम्पियनशिपमध्ये देखील त्याने सुवर्णपदक जिंकले होते.

घरची बेताची परिस्थिती असल्याने संकेतचे वडील पानाची टपरी चालवायचे, त्याचबरोबर त्यांचं नाश्ता सेंटरही होतं. संकेत वडिलांना मदत म्हणून दुकानावर बसायचा. वडिलांना शक्य तितकी मदत करायचा. होतकरु संकेतला पहिल्या पासूनच खेळाची आवड होती. वेटफिल्टिंगमध्ये त्याने योग्य ते प्रशिक्षण घेतलं. घरच्यांनी देखील संकेतला त्याच्या प्रयत्नांत साथ दिली. त्याला पाहिजे ती मदत केली. आवश्यक तो सपोर्ट केला. त्याच बळावर त्याने आपली घौडदौड सुरु ठेवली. अखेर आज त्याने भारताला कॉमनवेल्थ स्पर्धेतील पहिलं रौप्यपदक जिंकवून दिलं.

लहानपणापासूनच संकेत व्यायामशाळेत सराव करायचा. पहिले काही दिवस वेटलिफ्टर व्हायचं, हे त्याच्या मनातही नव्हतं. मात्र दररोजच्या सरावाने त्याला वेटलिफ्टिंगची सवय झाली. मग तो आपल्या करिअरमध्ये सिरिअस होऊन लक्ष देऊन सराव करु लागला. अपार कष्टामुळे अवघ्या २१ व्या वर्षी अपेक्षित यश मिळालं. आज मिळावेलं रौप्यपदक त्याने देशाच्या जवानांचरणी अर्पण केलंय. संपूर्ण भारतातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संकेतचं अभिनंदन केलंय.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

युध्दविराम 3 दिवसांनंतर केला असता तर POK भारतात असते! अमित शहांचे ‘ते’ भाषण व्हायरल…

युध्दविरामाचा निर्णय झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियात याबाबत नाराजी व्यक्त...

कलाकार व्हा, सेलिब्रिटी नव्हे:संतोष जुवेकर

'एमआयटी एडीटी'चा 'कारी-२०२५' महोत्सव संपन्न पुणेः कलाकृती ही कलाकारापेक्षा जास्त...

नरेंद्र मोदींच्या भाषणातील दहा मोठे मुद्दे

1. ऑपरेशन सिंदूरची कारवाई फक्त स्थगित केली आहे, पण...

अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भिक घालत नाही-PM नरेंद्र मोदी

पाकिस्तानसोबत ५१ तासांच्या युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले -...