नियोजित शिवस्मारक गिरगांव चौपाटीवर करावे-१८८ ओबीसी संघटनांची मागणी

Date:

पुणे- छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील नियोजित भव्य स्मारक मुंबईतील गिरगाव चौपाटीवर करावे व वाचलेल्या पैशांतुन मराठा समाजातील गरीब मुलामुलींच्या शिक्षणासाठी व आत्महत्याग्रस्त शेतक-यांसाठी ती रक्कम खर्च करावी अशी मागणी आज येथे ओबीसी संघर्ष समितीतर्फे एकमुखाने करण्यात आली. सरकारने राज्य मागास वर्ग आयोगावर केलेल्या नियुक्त्या बेकायदेशीर असल्याने या सर्व नियुक्त्या तात्काळ रद्द करुन नव्याने आयोगाची रचना करावी अशीही मागणी केली गेली. मराठा आरक्षणविषयक उच्च न्यायालयातील याचिकेवर 435 ओबीसी जातींतर्फे ओबीसीहिताची बाजू प्रखरपणे मांडली जाईल असा निर्णय घेण्यात आला. याबाबतचे प्रतिज्ञापत्र या आठवड्यात सादर केले जाईल. या कार्यक्रमात ओबीसी वर्गातील विविध १८८ जाती संघटनांचे राज्यभरातील प्रतिनिधी उपस्थित होते. ही आपल्या अस्तित्वाची लढाई असून ओबीसीच्या ताटातील घास पळवणारांना या निवडणुकीत धडा शिकवण्याचा निर्धार सर्वानुमते व्यक्त करण्यात आला.
कायदेतज्ञ अ‍ॅड. बी.एल. सगरकिल्लारीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या एकदिवशीय परिषदेत ओबीसी जातींच्या विविध प्रतिनिधींनी मराठा मूक मोर्चांद्वारे निर्माण केल्या जात असलेल्या सामाजिक दहशतीबाबत चिंता व्यक्त करत त्यांच्या ओबीसीकरणाला स्पष्ट विरोध केला. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वच मराठी माणसांचे आदर्श असून त्यांच्या यशात सर्वसामान्य ओबीसींचाही सिंहाचा वाटा आहे. त्यांचे भव्य स्मारक व्हायलाच हवे पण कोळी बांधवांची रोजीरोटी बुडवून व पर्यावरणाचे अपरिमित नुकसान करुन शिवस्मारक समुद्रात उभारण्याचा निर्णय रयतद्रोही असल्याने तो महाराजांनी कधीच घेतला नसता. त्यामुळे हे नियोजित स्मारक मुंबईतच समुद्रकिना-यावर करावे अशी मागणी विविध वक्त्यांनी केली.
राज्य मागास वर्ग आयोगावरील राज्य शासनाने केलेल्या नियुक्त्या आयोगाच्या कायद्याची पायमल्ली करणार्‍या आहेत. मूकमोर्च्यांच्या समितीतील व्यक्तीला अध्यक्ष नेमणे, गणिताच्या प्राध्यापकाला समाजशास्त्रज्ञ म्हणून नेमणे, मराठा आरक्षणाच्या बाजूने मतदान केलेल्या सदस्याची फेरनियुक्ती करणे, एकाच जातीचे बहुमत होईल अशी व्यवस्था करणे हा ओबीसीद्रोही निर्णय आहे. या आयोगावर नेमलेल्या एकाही सदस्याचा ओबीसी प्रवर्गाचा काडीमात्र अभ्यास नाही. आयोगावर एकही अनु.जाती, जमाती, विमुक्त, मुस्लीम ओबीसी, एसबीसी समाजाचा प्रतिनिधी घेतलेला नाही. ओबीसी आयोगाचा अध्यक्ष ओबीसीच असायला हवा. या नवनिर्मित आयोगावरील एकही व्यक्ती या ओबीसींच्या भल्यासाठी काम करील अशी शक्यता नाही. त्यामुळे या नियुक्त्या तात्काळ रद्द करुन नव्याने योग्य त्या ओबीसी प्रवर्गातील अभ्यासू तज्ञ व्यक्तींच या आयोगावर घ्याव्यात अशी मागणीही केली गेली. असे जर राज्य शासनाने केले नाही तर राज्यभरात याचा निषेध तीव्र आंदोलनाद्वारे केला जाईल असा इशाराही दिला गेला.
या बैठकीत प्रसिद्ध विचारवंत चंद्रकांत बावकर, संजय सोनवणी, अ‍ॅड. महादेव आंधळे, प्रा. हरी नरके, प्रकाश तोडणकर, संदेश मयेकर, कमलाकर दरवडे, दामोदर तांडेल, सिए जे. डी. तांडेल यांनी मार्गदर्शन केले तर रामदास भुजबळ, मृणाल ढोलेपाटील, प्रा. शंकर महाजन, मंगेश ससाणे, चंद्रशेखर भुजबळ आदि वक्त्यांनी आपले विचार मांडले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सोशल मीडियावर औरंगजेबाचं समर्थन: पुण्यात दोघांवर कारवाई

पुणे-राज्यभरात औरंगजेबच्या कबरवरुन राजकीय वाद सुरु असतानाच त्याचे गंभीर...

‘महिला कलाविष्कार‌’बहारदार गायन-वादनाच्या मैफलीस रसिकांची मनमुराद दाद

पुणे : प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशन आयोजित महिला कलाविष्कार मैफलीत...

महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राने दिलेलं योगदान लागू करण्यात येणाऱ्या सीबीएसई अभ्यासक्रमाद्वारे देशभरात कळले पाहिजे – दीपक मानकर

पुणे-राज्यातील शाळांमध्ये यंदाच्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून ‘सीबीएसई’ अभ्यासक्रम...