मुंबई- ‘शिवसेना हा पक्ष यूपीएमध्ये सहभागी नाही. महाराष्ट्रात फक्त किमान समान कार्यक्रमावरुनच शिवसेनेला पाठींबा दिला आहे. त्यामुळे यूपीएच्या नेतृत्वाबाबत शिवसेनेने, किंवा त्य पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सल्ला देऊ नये, असा इशारा कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील नेते अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला दिला आहे.
यूपीएच्या अध्यक्षपदावरुन शिवसेना आणि काँग्रेस आमने-सामने आलेली पाहायला मिळत आहे. यूपीएचे अध्यक्षपद काँग्रेस नेत्या सोनिया गांधींऐवजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे देण्याची मागणी केली जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही सामनाच्या अग्रलेखातून यूपीएच्या अध्यक्षपदी शरद पवार असावेत, असे म्हटले होते. त्यावरुन आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे.