Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

उद्योगपतींना कर्जमाफी, मग शेतकऱ्यांना का नाही?: सुनील तटकरे

Date:

 

पुणे-राज्यात आणि केंद्रात भाजप सत्तेत आल्यापासून या सरकारने उद्योगपतींची कर्जे माफ केली. मात्र हेच सरकार शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्यास तयार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सरकारवर टीका केली. शेतकरी कर्जमाफीसाठी चंद्रपूर येथून निघालेल्या संघर्ष यात्रेचे आज पुण्यात आगमन झाले. त्यानंतर बाजार समिती येथील निसर्ग मंगल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत तटकरे बोलत होते.
राज्यातील आणि केंद्र सरकारने जनतेची तीन वर्षांत फक्त दिशाभूल करण्याचे काम केले आहे. त्यातील एक भाग म्हणून या सरकारकडे उद्योगपतींचे कर्जमाफ करण्यास वेळ आहे. मात्र जो शेतकरी जनतेला जगवतो. त्याकडे हे सरकार लक्ष देत नसून, अद्यापही कर्जमाफी आणि शेतमालास हमीभाव जाहीर केला नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले. या मागण्या मान्य न झाल्यास येत्या काळात संघर्ष यात्रा तीव्र केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. या सरकारकडे शेतकऱ्यांसाठी कोणतेही धोरण नाही, अशी टीकाही त्यांनी केली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, सपाचे नेते अबू आझमी, जोगेंद्र कवाडे, पृथ्वीराज चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, अशोक चव्हाण, आमदार जितेंद्र आव्हाड, राधाकृष्ण विखे पाटील आदी उपस्थित होते.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सहकारी बँकांनी ग्राहक आणि लोकाभिमुख व्हायला हवेउपमुख्यमंत्री अजित पवार

रामराज्य सहकारी बँक लि. च्या नव्या वास्तूच्या कोनशिलेचा...

संजय राऊतांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती.. म्हणून पत्रा चाळ ED: शरद पवारांची फटकेबाजी

मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला...

तर मी नरकात जाणं पसंत करेन, जावेद अख्तर यांची पाकिस्तानवर जोरदार टीका

मुंबई “जर मला पाकिस्तान आणि नरक यापैकी एकाची निवड...