Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कोपलेला निसर्ग आणि फुटीरतावादी यांच्यावर मात करत अमरनाथ यात्रा सफल….

Date:

index1 index

दिनांक २५ जुलै ला सकाळी ११:३० वाजता पुणे विमानतळावरुन श्रीनगर साठी उड्डाण केले.सर्व मित्रपरिवार,वृत्तपत्रे,सोशल मीडिया,शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून बुरहान वानी ला भारतीय सैन्याने गोळ्या घातल्यानंतर काश्मीर मधील स्फोटक परिस्थितीची माहिती मिळत होती,पण माझी अमरनाथ यात्रा पूर्वनियोजित होती आणि त्यातुन अतिरेकी आणि पाकिस्तानवादी सेपरेटिस्ट्स यांना यात्रा होवू नये असे वाटत असून त्यासाठी सर्व दंगा चालू असल्याचे समजले आणि माझ्यातला कट्टर हिंदू राष्ट्रभक्त जागा झाला.वाट्टेल ते झाले तरी देशद्रोह्यांच्या धमक्यांना भीक घालायची नाही आणि काश्मीर ला जायचेच या माझ्या भावनेला माझी पत्नी मंजु ,मुले प्रतीक आणि प्रणेती यांनी साथ दिली आणि आम्ही श्रीनगर ला येउन पोहोचलो.सर्वत्र भारतीय सैन्याचा खडा पहारा,रस्त्यावर चिटपाखरु ही नाही,आणि सर्वत्र भीषण शांतता आणि भयाण वातावरणात माझी भाची दीपाली भातखंडे तात्पुरती रहात असलेल्या घरी पोहोचलो.( दीपाली ही श्रीनगर येथे आर्ट ओफ लिविंग चे कोर्स घेण्यासाठी २००७ सालापासून येथे येत आहे व ती येथे आर्मी बी एस एफ,सी आर पी एफ व अन्य लोकांना प्रशिक्षण देते) ती रहात असलेला जवाहर नगर राजबाग हा तुलनेने कमी धोकादायक भाग Cosmopolitan area/ सोबत गाडी चालवायला उमर नावाचा स्थानिक तरुण होता.उमर फारुख बाबा हा इंटरनॅशनल असोसिएशन फोर ह्युमन वाल्युस या संस्थेत म्युझिक टीचर म्हणून कार्यरत होता व त्यातूनच तो दीपालीच्या संपर्कात आला.सर्वात अडचणीचा विषय म्हणजे संपूर्ण काश्मीर मधे बी एस एन एल पोस्टपेड वगळता सर्व मोबाईल व इंटरनेट सेवा खंडित करण्यात आल्याने आमच्या अडचणीत वाढच होत होती.हतबलता म्हणजे काय याचा पुरेपूर अनुभव घेत होतो आम्ही. रात्री च्या अंधारात १२ वाजता किंवा पहाटे ४ वाजता श्रीनगर सोडण्याचे आदेश होते त्याप्रमाणे पहाटे ४ वाजता कार ने श्रीनगर, गंदरबल,गुंड ,कंगन ,सोनमर्ग करत तीन तासाने बालताल ला पोहोचलो.संपूर्ण मार्गावर सैन्य आणि सी आर पी एफ चा खडा पहारा आणि तणाव जाणवत होता.चुकुन एखादे वाहन जाताना दिसत होते.अश्यात उमर चा मोठाच आधार वाटत होता. बालताल येथे मात्र तुलनेने तणाव कमी होता व येथुन हेलीकॉप्टरने पंचतरणी येथे पोहोचलो व तेथुन अमरनाथ दर्शनासाठी ६ कि मी ची डोंगररांग ओलांडत पायी यात्रा सुरु केली.यावर्षी तुरळक गर्दी  आणि तणावपूर्ण वातावरणात यात्रा सुरु होती.निसर्गरम्य वातावरणात अमरनाथाच्या दर्शनाने मन तृप्त झाले पण त्यापेक्षा जास्त अभिमान वाटला तो आपल्या सैनिकांचा.जे विपरीत परिस्थितीत खडा पहारा देत आमचे रक्षण करत होते व अतिरेकी आणि फुटीरतावादी पाकिस्तानवाद्यांचे सर्व षडयंत्र निकामी करत देशाचे रक्षण व यात्रा सफल होण्यासाठी सर्वस्व पणाला लावत होते.अनेकांशी संवाद साधला तेव्हा त्यांच्यातला जाज्वल्य देशाभिमान आणि ” भारत सरकार ने एकदा आदेश देउ देत या पाकड्याना कायमचे गाडुन टाकु ” हे शब्द यात्रेच्या सफलतेची ग्वाही देत होते.पण बहुधा परमेश्वराला आमची परीक्षा पहायची होती. निसर्ग कोपला,प्रचंड पाउस सुरु झाला व आम्ही सुमारे २५० प्रवासी पंचतरणी ला अडकुन पडलो.हेलीकॉप्टर सेवा स्थगित करण्यात आली होती व पायी अथवा घोडयावर बालताल ला जाण्याच्या मार्ग ही बंद झाला. अश्या वेळी येथे माणुसकी चा झरा वहात होता.हरियाणातील फतेहाबाद च्या शिव सेवा मंडळ ट्रस्ट ने आम्हाला कंबल/पांघरून व जेवण तसेच झोपायला टेंट उपलब्ध करुन दिले आणि ते ही मोफत.अशी सेवा करणारे भंडारा वाले भक्त आणि आपले शूर सैनिक यांच्यापुढे नतमस्तक.27 तारखेला सकाळी परत आशा निराशेचा खेळ सुरु झाला.निसर्ग परत एकदा कोपला आणि हेलिकॉप्टर सेवा स्थगित करण्यात आली.आमची प्रार्थना बहुधा बर्फानी बाबा अमरनाथ ने ऐकली असावी.ग्लोबल चे एक हेलिकॉप्टर खराब हवामानात ही पंचतरणी ला उतरले आणि मी व माझ्या कुटुंबाचा पहिलाच नंबर असल्याने आम्ही चौघे व इतर दोघे असे ६ जण अवघ्या ७ मिनिटांचा प्रवास जीव मुठीत धरुन पूर्ण केला.प्रचंड धुके व पाउस,अश्या भीषण परिस्थितीत आमच्या पायलट ने अत्यंत कुशलतेने आम्हाला बालताल ला सुरक्षित उतरविले.मात्र उतरल्या उतरल्या त्याने आता हेलिकॉप्टर फेरी स्थगित असे जाहीर केले.मी त्याचे हात हातात घेऊन कृतज्ञता पूर्वक त्यांना नमन केले व आभार मानले.पण ते ही आतून हललेले होते व We should not have flown असे म्हणून त्वरेने निघून गेले.मी व माझे संपूर्ण कुटुंब निशब्दपणे परमेश्वराच्या रुपाने आलेल्या त्या पायलट च्या पाठमोरया आकृती कडे बघत होतो.जणु आम्हास बाबा अमरनाथ पावले असावेत.तेथुन आम्ही सोनामार्ग (सोनमर्ग ) ला पोहोचलो.तेथे फ्रेश होऊन थिगवासा ग्लेशियर व निसर्ग सौंदर्य बघुन पुढील प्रवासाचा कार्यक्रम निश्चित करत होतो. तेवढ्यात श्रीनगर च्या मार्गावरील कंगन या गावात तणाव वाढल्याचे समजले तसेच उद्या शुक्रवार असुन उद्या मोठ्या प्रमाणात गडबड होइल त्यामुळे श्रीनगर ला जावु नका असा सल्ला अनेकांनी दिला व त्यामुळे श्रीनगर ला परत जाण्याचा बेत रद्द करुन लेह लद्दाख कडे जाण्याचे निश्चित केले असून तिकडे मार्गस्थ होत आहोत.

मोदीजी एक बार आदेश दे तो इस साल की दिवाली लाहोर मे मनाएंगे “

काश्मीर मधील परिस्थितीने अमरनाथ च्या यात्रेवर परिणाम झाला याबद्दल तेथे असलेले घोडेवाले ,पालखी वाले ,दुकानदार व स्थानिक नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. ” साहब इनकी सियासत मे हम भूखो मर रहे है,इस बार बिल्कुल धंदा नही हुवा ,ये श्रीनगर वाले ये भूल जाते है की अगर टुरिस्ट नही आएंगे तो हम खायेंगे क्या ? गुज्जर समाजातील तरुणांनी दिलेली ही प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे.शोपियान अनंतनाग श्रीनगर या सर्व भागातील तरुणांना पाकिस्तान पैसे पुरवतो आणि आपल्या सैन्यावर आणि बी एस एफ ,सी आर पी एफ वर दगडफेक करायला भाग पाडतो असे हे या तरुणांनी सांगितले.
आम्ही संपूर्ण यात्रा पायीच करायचे ठरवले होते मात्र या तरुणांशी संवाद साधल्यावर आणि त्यांनी खूप पाठपुरावा केल्यावर दर्शन करुन परतताना आम्ही घोडे करण्यास बाध्य झालो. जाऊन येउन १५००/२००० घेणारे घोडेवाले शब्दशः आमच्या मागे लागून अवघ्या १५० रुपयात आम्हाला पंचतरणी ला आणण्यास तयार झाले यावरुन तेथील बेकारीची आणि स्थानिकांच्या दुरावस्थेची कल्पना यावी.त्यामुळे भीती झुगारून जर जास्तीत जास्त लोक काश्मीर ला गेले तर फुटीरतावादीना निश्चितच मोठा धक्का बसेल आणि स्थानिक व्यावसायिकांच्या दबावापुढे झुकावे लागेल असे दिसते.
बाकी काही असो …. फुटीरतावादीना सरसकट नागरिकांचा पाठिंबा नाही आणि आपले सैन्य बी एस एफ आणि सी आर पी एफ चे जवान जबरदस्त काम करत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे.
अगदी अमरनाथ च्या वाटेवर ही बी एस एफ चे जवान आम्हाला चहा ,काफी ,शिरा पुरी ,गरम पाणी ,लिंबु पाणी ,व इतर सर्व मदत करत होते यात सगळे आले .
आणि मी भाजप चा आहे हे सांगितल्यावर ” अरे साहब मोदी जी से कहिये की एक बार आदेश दे तो इस साल की दिवाली लाहोर मे मनाएंगे ” हे सांगताना जवानांचे चमकणारे डोळे आणि त्यांच्या देशासाठी पूर्णाहुती देण्याच्या भावनांनी माझे उर अभिमानाने भरुन आले. जोपर्यंत आपले सैन्य आहे तोवर काश्मीर तर दूर कोणी आपल्या सीमेच्या आसपास ही फिरकु शकणार नाही याची खात्री पटली .
आज कारगील च्या मार्गावर एका होटेल मधे वाय फाय उपलब्ध झाले . ही संधी साधून हे लिखाण केले आहे  …..
संदीप खर्डेकर.
मो ९८५०९९९९९५

index4 5

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सहकारनगरमध्ये ज्योतिषाकडून तरुणीचा विनयभंग

पुणे-एका ज्योतिषाकडून तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना सहकारनगर भागात...

पुणे वाहतूक शाखेतील पोलिस हवालदाराची आत्महत्या:मुलं शाळेतून आल्यावर घरात दिसला वडिलांचा मृतदेह

पुणे-पुणे पोलिस दलातील वाहतूक शाखेतील पोलिस हवालदाराने गळफास घेऊन...

ना कोयता थांबतोय, ना कट्टा ,ना मॅफेड्रॉन ..पुण्याला बसतोय विळखा

पुणे- राजकारण प्रत्येक पक्षात शिगेला पोहोचलेले असताना ते एकमेकावर...

पुणे शहरातील गणेशोत्सव सर्व दिवस 24 तास खुला राहण्यासाठी आमदार हेमंत रासनेंकडून पाठपुरावा सुरु

पुणे (दि २०): राज्य सरकारकडून गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून...