पुणे-इनवेस्ट एन गेन कंपनीत गुंतवणुक केल्यास मासिक चार टक्के परतावा गुंतवणुकदारांना देण्यात येईल असे सांगनू विश्वास संपादन करुन दहा जणांची ११ काेटी ४० लाख ४५ हजार रुपयांची आर्थिक फसवणुक केल्या प्रकरणी इनवेस्ट एन गेन कंपनीचे संचालक निखील चढ्ढा, निखील मिश्रा, कंपनीचे चीफ बिझनेस अधिकारी झुबीन गांधी यांचेवर येरवडा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत प्रतिम सुशील उपलप (वय-३४,रा.हडपसर,पुणे) यांनी पाेलीसांकडे फिर्याद दाखल केली आहे .सदरचा प्रकार २०/१/२०२३ ते ६/४/२०२४ या दरम्यान घडला आहे.पाेलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना आरोपींनी त्यांचे कंपनीत ३० दिवसांसाठी पैसे गुंतवले तर चार टक्के मासिक परतावा दिला जाईल असे अमिष दाखवले. त्यानुसार तक्रारदार यांनी वेळाेवेळी संबंधित इनवेस्ट एन गेन कंपनीत आरटीजीएस द्वारे दाेन काेटी ४५ लाख ५० हजार रुपये व ४५ लाख २५ हजार रुपये राेख रक्कम गुंतवणुक केली. या रकमेच्या गुंतवणुकीबाबत तक्रारदार व आरोपी यांची बँक यांच्यात करार झालेला आहे. गुंतवणूक केलेल्या दाेन काेटी ९० लाख ७५ हजार रुपये रकमेपैकी कंपनीकडून ४५ लाख ५० हजार रुपे तक्रारदर यांना परत मिळाली. परंतु उर्वरित रक्कम दाेन काेटी ४५ लाख २५ हजार रुपये मिळण्यासाठी त्यांनी आरोपींची समक्ष भेट घेऊन त्यांचेकडे मागणी केली, त्यावेळी कंपनीने गुंतवलेल्या रकमेबाबत पाेस्ट डेटेड चेक देखील दिले. आरोपी हे तक्रारदार यांना सातत्याने पैसे परत करण्याचे आश्वासन देत असल्याने तक्रारदार यांनी दिलेले पाेस्ट डेटेड चेक देखील बँकेत वठविलले नाही.
दिलेल्या तारखेस उर्वरित रक्कम न मिळाल्याने तक्रारदार यांनी पुन्हा आराेपींची भेट घेतली असता त्यांनी पैसे देण्याबाबत उडवाउडवीची उत्तरे देऊन पैसे देण्यास टाळाटाळ केली. तसेच तक्रारदार यांची दाेन काेटी ४५ लाख २५ हजार रुपयांची व इतर नऊ गुंतवणुकदारांची अाठ काेटी ९५ लाख २० हजार रुपये असे एकूण ११ काेटी ४० लाख ४५ हजार रुपये परत न करता आराेपींनी विश्वासघात करुन पैशाचा अपहार करत गुंतवणुकदारांची आर्थिक फसवणुक केली आहे. याबाबत पुढील तपास येरवडा पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस जाधव करत आहे