पुणे- शेकडो कोटींच्या ड्रग्ज व्यवसायाचा पर्दाफाश करून फडशा पाडणाऱ्या पुणे पोलिसांना भुरट्या चोरट्यांनी हैराण करून सोडले आहे,बस मध्ये चोऱ्या, घरफोड्या यांच्या घटना वाढलेल्या असताना आता तर चोरट्यांनी पोलिसांनाच ओपन चॅलेंज दिले आहे. वाहन चोरांनी सर्वसामान्य नागरिकांसह पोलिसांची देखील वाहने चोरून नेली आहेत आणि ती चक्क पोलीस आयुक्तालयासमोरून चोरून नेली आहेत, असे वृत्त येथे समजते आहे. पोलीस आयुक्त कार्यालय परिसरात सीसीटीव्हीअसताना आणि पोलिसांची सतत ये-जा असताना पोलिसांची वाहने चोरुन नेल्याने खळबळ उडाली आहे.पुण्यात लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रीया १३ मे रोजी पार पडली. मतदान प्रक्रियेच्या कालावधीत पोलीस प्रशासन गुंतलेले असताना चोरट्यांनी पोलीस आयुक्तालयासमोरील पार्किंगमधून तीन दुचाकी चोरुन नेल्याचे समजते आहे.मात्र याबाबत अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती मिळत आहे. हा प्रकार 12 ते 14 मे या कालावधीत घडल्याचे समजते.पुणे शहरातील विविध भागातून दररोज पाच ते सात दुचाकी चोरीला जातात.याबाबत पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येतो.मात्र, चोरटे सापडत नाहीत आणि वाहने देखील मिळत नाहीत.चोरट्यांनी पोलिसांच्या नाकावर टिच्चून पोलीस आयुक्तालयातून वाहने चोरी करण्याचे धाडस दाखवून पोलिसांनाएक प्रकारे चॅलेंज दिल्याची चर्चा सध्या सुरु आहे. त्यामुळे सर्व सामान्यांची वाहने सुरक्षित नाहितच शिवायपोलीस आयुक्तालयासमोरील पार्किंगमध्ये पार्क केलेली पोलिसांची वाहने देखील सुरक्षित नसल्याचे बोलले जाऊ लागले आहे.