Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

संकलन अभियानात ६५६ किलो ई कचरा ४१ किलो ट्यूबलाईट कचरा व २५ किलो प्लास्टिक कचरा जमा….

Date:

पुणे-नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी प्रभाग क्रमांक १३ हा कचरा मुक्त करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार केला असून त्या अंतर्गत प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी विविध सोसायट्यांमध्ये ई कचरा ,प्लास्टिक कचरा तसेच ट्यूबलाईट संकलन मोहीम राबविण्यात येते.कायमस्वरूपी चालणाऱ्या या मोहिमेस पुणे महानगरपालिका,श्री रिसायकलर्स,क्रिएटीव्ह फाउंडेशन ,वनराई,कमिन्स इंडिया व एम पी एम इ क्लीन गार्बेज यांचे सहकार्य लाभले या सर्व सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने सदर मोहीम राबविण्यात आली,एकूण ४० सोसायटीच्या सभासदांनी या उपक्रमात सहभागी होऊन तब्बल ६५६ किलो ई कचरा,४१ किलो ट्यूबलाईट व २५ किलो प्लास्टिक कचरा संकलनास सहायय केले.ई कचऱ्यामध्ये नागरिकांनी नादुरुस्त असलेले कम्प्युटर,की बोर्ड,मोबाईल ,चार्जर,सी डी,कॅसेट्स,टेलिफोन,इस्त्री,ओव्हन इ साहित्य दिले.या सर्व साहित्याच्या बदल्यात सोसायट्यांना एल ई डी ट्यूबलाईट फिटिंग व एल इ डी बल्ब मोफत देण्यात आले.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नागरी सहभागातून पर्यावरणाच्या ऱ्हासाच्या गंभीर समस्येवर उपाययोजना करणे गरजेचे असल्याने याबाबत नागरिकांना ई कचऱ्यामुळे आपल्या भोवतीचे हवा पाणी प्रदूषित होत असल्याबद्दलची माहिती देण्यात आली व त्यामुळे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे ई कचरा साठवून तो या संकलन मोहिमेत आमच्या संकलकांकडे सुपूर्द केल्याचे संयोजक नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.या उपक्रमात पुणे कॉलेज ऑफ फार्मेसी चे प्रा रवींद्र कांबळे व त्यांच्या ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व जनजागृती तसेच संकलन अभियान यशस्वी केल्याचे मनपा चे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक दीपक ढेलवान यांनी सांगितले.दिवसभर चाललेल्या या मोहिमेत श्री रिसायकलर्स चे विनीत बियाणी, आरोग्य निरीक्षक किरण गुरव,राहुल शेळके,क्लीन गार्बेज चे ललित राठी,वनराई चे मुकुंद शिंदे,जनवाणीचे उमेश भाग्यवंत ,इ सक्रियरित्या सहभागी झाले होते.
नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या हस्ते सोसायट्यांना मोफत एल इ डी ट्यूबलाईट फिटिंग व बल्ब भेट देण्यात आले तर दीपक ढेलवान यांनी जनजागृती व संकलन मोहिमेचे नेतृत्व केले.
सदर मोहीम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी कायमस्वरूपी राबविण्यात येणार असून नागरिकांची गरज आणि उत्स्फूर्त सहभाग पाहता लवकरच ही मोहीम संपूर्ण कोथरुथ मध्ये राबविण्याचा निर्धार क्रि एटीव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केला.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सामान्य व गरीब व्यक्तींच्या सुखान्ताचा ग्राफ वाढवावा-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

श्री सरस्वती कराड हॉस्पिटलचे उद्घाटन‘केअर’, ‘क्युअर’ व ‘हील’ तत्वांशी...

दुप्पट मताधिक्याने पोटनिवडणुकांमधील विजय ही तर देशभरातील आप च्या पुनरागमनाची चाहूल

पुणे- दुप्पट मताधिक्याने पोटनिवडणुकांमधील विजय ही तर देशभरातील आप...

रसिकांची दाद कलाकारांना सुखावते : पं. सुहास व्यास

पंचामृत संगीत कला प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ कलाकारांचा गौरव डॉ. श्याम गुंडावार,...

डॉ. दीपक हरके यांना अमेरिका, बोस्टन येथील ग्लोबल युनिव्हर्सिटीची ॲानररी डॅाक्टरेट

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते सन्मानित पिंपरी, पुणे...