समीर बेलवलकर यांच्या फोटोग्राफी कार्यशाळेचे आयोजन
पुणे- छायाचित्रकार समीर बेलवलकर यांनी दोन दिवसीय फोटोग्राफी कार्यशाळेचे आयोजन केले आहे. फोटो शूट करत असताना फोटोग्राफरनी घ्यावयाची काळजी याचे विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे. फोटोग्राफीची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारची फोटोग्राफी स्किलफुली करता यावी यासाठी मार्गदर्शन करणे हे यामागील उद्दिष्ट आहे.
दोन दिवसीय कार्यशाळेत फोटोग्राफी अत्यंत विस्तृतपणे समजून सांगितली जाणार आहे. फोटोग्राफीबरोबरच मॉडेलशी सुसंवाद साधणे, वैयक्तिक कौशल्य आणि व्यक्तिमत्व वृद्धिंगत करणे, जनसंपर्क वाढवणे, इमेज मेक ओव्हर आणि स्वतःची स्टाइल डेव्हलप करणे यासह इतर विषयांवर समीर बेलवलकर मागर्दर्शन करणार आहेत. विद्यार्थ्यांच्या रचनाशैलीत तांत्रिकदृष्ट्या सकारात्मक बदल घडवून आणण्याचे काम या कार्यशाळेत होईल असा विश्वास समीर बेलवलकर यांनी व्यक्त केला आहे.
कार्यशाळेचे आयोजन करत असलेले समीर बेलवलकर आज फॅशन आणि जाहिरात फोटोग्राफी उद्योगातील एक प्रसिद्ध व नामवंत व्यक्तिमत्व आहे. जोधा-अकबर, माय नेम इज खान, वी आर फॉमीली सारख्या मोठ्या हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले आहे. करिना कपूरसह शाहरुख खान, अजय देवगण, अर्जुन रामपाल, तुषार कपूर, काजोल, प्रियंका चोप्रा, जॉन अब्राहम, वरूण धवन यांच्या सारख्या अनेक ख्यातनाम सेलिब्रिटींसाठीही त्यांनी जाहिरात आणि वैयक्तिक फोटोशूट केले आहे.
तारीख- शनिवार १० व रविवार ११ डिसेंबर, २०१६
स्थळ- मियामी, जे. डब्ल्यू. मॅरिएट हाॅटेल, एस.बी. रोड, पुणे.
वेळ- शनिवार सकाळी १० ते सायंकाळी ६
रविवार सकाळी ९ ते सायंकाळी ६
अधिक माहतीसाठी- images@sameerbelvalkar.com
दूरध्वनी क्रमांक – ९८२३०३३२७०