पुणे-दीनानाथ मंगेशकर रूग्णालय धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत आहे. रूग्णालयात जादुटोणा होतो हे धक्कादायक व निषेधार्ह आहे. म्हणून… दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचा परवाना रद्द करावा… कारण एका व्यक्तीचा जीव गेलेला आहे. म्हणून संबंधितांवर कारवाई करावी…अशी मागणी संभाजी ब्रिगेड चे संतोष शिंदे आणि कार्यकर्त्यांनी केली आहे .
या संदर्भात शिंदे यांनी म्हटले आहे कि,डॉ. सतीश चव्हाण या डॉक्टरने महिलेवर उपचार करण्यासाठी चक्क ‘मंत्रतंत्राचा वापर केला’ हे स्पष्ट झाले. मात्र या भोंदूगिरीत रूग्न महिलेचा मृत्यू झाला. हि घटना अतिशय धक्कादायक असून दुर्दैवाने या बनावट भोंदूगिरीत विवाहितेला जिव गमवावा लागला. हा सर्व प्रकार पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडला आहे.समतावादी चिकित्सक पुण्यातील स्वारगेट परिसरात कर्मठ डॉ. सतीश चव्हाण यांच्याकडे सौ. संध्या सोनवणे (वय २४ वर्ष) या महिला उपचारासाठी आली होत्या. त्यांच्या छातीत दुधाची गाठ झाल्याचा वैद्यकीय अहवाल आला होता. मात्र ऑपरेशन केल्यानंतर तिची प्रकृती खालावली गेली म्हणून त्यांना तातडीने डॉ. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात करण्यात आले.त्याठिकाणी असे मंत्रतंत्राचे प्रकार सुरू असल्याने एका महिलेचा जिव गेला. म्हणून संबंधीत दोषी प्रशासनावर ‘मानवी हत्येसह अंधश्रध्दा विरोधी गुन्हा दाखल करून कठोर शासन झाले पाहिजे. तसेच रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र रद्दकेले पाहिजे यासह
राज्य सरकारने रूग्णालयास मिळणारे सर्व शासकीय अनुदान बंद करावे.,मृत सौ. सोनवणे यांच्या मुलांना पालकत्व म्हणून रूग्णालयाने ५० लाख रूपये तातडीने मदत करावी. पुणे शहर व जिल्ह्यात सर्व रूग्णालयात अशासकिय सदस्यांची तातडीने नियुक्ती करून त्यांना हक्क अधिकार द्यावेत.हे प्रतिष्ठित हास्पिटल समस्या व तक्रारींचा ड्डा आहे… तर त्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्यां कर्मचाऱ्यासह सामान्य लोकांचे हद्दपार केंद्र बनले आहे असेही संभाजी ब्रिगेड ने म्हटले आहे.
यासंदर्भातील निवेदन ब्रिगेडच्या वतीने सहा. धर्मादाय आयुक्त नवनाथ जाधव यांना संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, अमर जमादार, नगर जिल्हा सचिव टिळक भोस, छायाताई खैरनार, अॕड. विकास शिंदेयांनी दिले .