छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगातील प्रथम पुतळ्याला अनोख्या पद्धतीने अभिवादन…
पुणे- – पुणेरी पगडी मनुवादीचे तर फुले पगडी समतेचे प्रतिक आहे असे विचार विकास पासलकर यांनी येथे व्यक्त केले .
शिवाजीनगर येथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगातील पहिल्या अश्वारुढ स्मारकाला काल ९१ वर्ष पुर्ण झाली. त्या निमित्ताने ‘संभाजी ब्रिगेड’ तर्फे महात्मा फुले यांची पगडी, छत्रपती शिवरायांचा जिरेटोप, मावळ्यांची शिंदेशाही पगडी तसेच राजर्षी शाहू महाराजांचा फेटा व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान व ‘पेन’ यांचे पूजन करून मानवंदना देण्यात आली. प्रसंगी उपस्थितांना शिवचरित्राचे वाटप करण्यात आले व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला…
छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे विचार ही आमची प्रेरणा आहे. म्हणून समतेचे रयतेचे विचार आम्ही सांगतो. ‘पुणेरी पगडी’ नाकारून महात्मा फुले यांची पगडी वापरण्याची सूचना केली शरद पवारांनी केली. त्यामुळे बऱ्याच जणांचा पोटसूळ उठला. परंतु हा वैचारिक सन्मान आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील तथाकथित विद्वानांनी उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. पुणेरी पगडीसाठी आकांडतांडव करणारे खरे जातीयवादी आहेत. पुणेरी पगडी हे विषमतेचे व मनुवादी मनोवृत्तीचे प्रतीक आहे व फुले पगडी हे समतेचे प्रतीक आहे त्यामुळे मराठा सेवा संघाने पंचवीस वर्षांपूर्वीच पुणेरी पगडी नाकारली आहे. मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून शिंदेंशाही पगडी घालून सन्मान केल्या जात असल्याचे पासलकर यांनी नमूद केले. पुणेरी पगडीच्या कुजक्या मानसिकतेतूनच छत्रपती शिवरायांच्या जगातील पहिल्या स्मारकाला पुण्याच्या विद्वानांनी विरोध केला होता हे आम्ही विसरलेलो नाही. येत्या काळात फक्त पगाडीच नाही तर पगडीच्या खालील डोक्यात मेंदुसुद्धा आमच्याच विचारांचा असेल असे प्रतिपादन विकास पासलकर यांनी केले.
महापुरूषांचा वैचारिक वारसा आम्ही लोकशाहीत समर्थपणे पुढे चालवू… विचारांचा जागर करत आहोत. पुरोगामी महाराष्ट्राची ओळख हाच आमचा चेहारा आहे. समता, समानता व बंधुता हा आमचा श्वास आहे. पुरूषोत्तम खेडेकर साहेबांनी आमच्या सारख्या तरूणांना फुले शाहू आंबेडकर चांगल्या पध्दतीने सांगितले नसते तर… विषमतेच विष आमच्याही आंगात भिनलं असतं. परंतु प्रबोधन चळवळीत काम करून जिवन बदलले… याचे श्रेय ‘समतेच्या चळवळीला व सत्यशोधक विचारांना जाते. तो वारसा आम्ही सक्षमपणे चालवू… असे मत संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.
शिवरायांचा जिरेटोप, फुलेंची पगडी, शिंदेशाही पगडी व शाहूफेटा… यांना अभिवादन प्रसंगी संभाजी ब्रिगेड’चे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, मराठा सेवा संघाचे कैलास वडघुले, संदिप लहाने, मंदार बहिरट, दिलीप शिंदे, सचिन जोशी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन मंदार बहिरट व सचिन जोशी यांनी केले. संतोष शिंदे यांनी प्रस्ताविक केले, कैलास वडघुले यांनी आभार मानले. धन्यवाद…