विश्वजीत सणस, साईइती वराडकर यांची दुहेरी मुकुटाकडे वाटचाल

Date:

पुणे, 28 एप्रिल 2022: बाऊन्स टेनिस अकादमी व सनी वर्ल्ड आणि कासट सारीज रविवार पेठ पुरस्कृत यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या बाऊन्स टेनिस अकादमी -एमएसएलटीए एआयटीए 14वर्षांखालील सुपर सिरिज 2022 स्पर्धेत मुलींच्या गटात साईइती वराडकर हिने, तर मुलांच्या गटात विश्वजीत सणस या खेळाडूंनी एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे.
सनी वर्ल्ड टेनिस कोर्ट, पाषाण सुस रोड येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात उपांत्य फेरीत अव्वल मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवणाऱ्या साईइती वराडकर हिने श्रेया पठारेचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करत आपले आव्हान कायम राखले. दुसऱ्या मानांकित कर्नाटकाच्या जीडी मेघनाने महाराष्ट्राच्या पाचव्या मानांकित सिया प्रसादेचा 6-4, 7-5 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुहेरीत साईइती वराडकर व देवाश्री महाडेश्वर यांनी मृणाल शेळके व ह्रितिका कापले यांचा टायब्रेकमध्ये 7-6(1), 6-0 असा पराभव करून आगेकूच केली.
मुलांच्या गटात तिसऱ्या मानांकित महाराष्ट्राच्या विश्वजीत सणस याने पाचव्या मानांकित अवनीश चाफळेचा 6-3, 1-6, 6-4 असा तर, दक्ष पाटीलने सक्षम भन्साळीचा 6-2, 6-4 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.दुहेरीत उपांत्य लढतीत विश्वजीत सणस व छनामल यले यांनी सनत कडले व सूर्या काकडे यांचा 6-4, 6-2 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
निकाल: मुख्य ड्रॉ(उपांत्य फेरी): मुली:साईइती वराडकर(महा)वि.वि.श्रेया पठारे(महा)6-3, 6-2;जीडी मेघना(कर्नाटक)[2] वि.वि.सिया प्रसादे(महा)[5] 6-4, 7-5;
मुले: विश्वजीत सणस(महा)[3] वि.वि.अवनीश चाफळे(महा)[5] 6-3, 1-6, 6-4;दक्ष पाटील(महा)वि.वि.सक्षम भन्साळी(महा)6-2, 6-4; 
दुहेरी गट:मुले: उपांत्य फेरी: शिवतेज शिरफ़ुले/शार्दूल खवळे[1] वि.वि.अयान शेट्टी/अहान शेट्टी[4] 6-4, 4-6, 10-8;विश्वजीत सणस/छनामल यले[3]वि.वि.सनत कडले/सूर्या काकडे 6-4, 6-2;
मुली:साईइती वराडकर/देवाश्री महाडेश्वर वि.वि.मृणाल शेळके/ह्रितिका कापले 7-6(1), 6-0;सिया प्रसादे/देवांशी प्रभुदेसाई वि.वि.आर्या शिंदे/सेरेना रॉड्रिक्स 6-0, 6-4

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेत करोडो कमावणाऱ्या सल्लागारांचा सुळसुळाट

पुणे- महापालिकेचे अधिकारी आणि प्रशासन सुस्त झालेले आहे काय...

राजकारण कमी करा अन विकास कामांवर जास्त लक्ष द्या:मंत्री माधुरी मिसाळांनी महापलिकेच्या विकास प्रकल्पांना गती देण्याचे दिले आदेश

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगरपालिकेच्या विकास प्रकल्पांचा...

मंत्री नीतेश राणेंना 1 महिना कारावासाची शिक्षा अन् 1 लाखाचा दंड

कॉंग्रेसमध्ये असताना केलेल्या आक्रमक आंदोलनाची शिक्षा मुंबई-सिंधुदुर्ग जिल्हा व...

मंत्री प्रताप सरनाईक ठाम,म्हणाले, महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी यायलाच हवं

मुंबई- राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी राज्यातील...