शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आज डोंगरे सभागृह, वडार वाडी येथे महिला संवाद मेळावा
पुणे, ता. ९ : ‘सामान्य महिलांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यात असलेले रोजगार, पाण्याचे प्रश्न, घरकाम आदींमध्ये व्यस्त असूनही त्या सेनेच्या मेळाव्याला आवर्जून येतात. शिवसेनेच्या महिला या त्यांच्या कामामुळे अधिक सुंदर आहेत. महिलांना शिवसेनेच्या सरकारने १९९५ पासून समाजात अधिक विकासाच्या संधी दिल्या. शिवसेना महत्त्वाचे म्हणजे महिलांना सुरक्षितता देते. शिवसेना महिला कार्यकर्त्या म्हणजे माझी कवच कुंडले आहेत,’ असे प्रतिपादन आज विधान परिषद उपसभापती ना डॉ नीलम गोऱ्हे यांनी आज येथे केले.
त्यांनी यावेळी उपस्थित महिलांना रामनवमी आणि चैत्रगौरी उत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
त्या म्हणाल्या, “शिवाजीनगर मोठे आहेच पण महिलांच्या श्रमावर काम सुरू करणाऱ्या महिलांच्या जीवावर अधिक मोठे होत आहे. नोकरी निमित्त महिला मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडतात. आजचा जमाना मार्केटिंगचे आहे. उद्योगासाठी महिला गटाना मोठ्या प्रमाणात मदत होत आहे. अनेक महिलांनी उद्योगाच्या जोरावर आपला विकास साधला आहे. आपल्या आरोग्यासाठी जागरूक राहून विकास केला पाहिजे. आपण आयुष्यात तणाव घेतला नाही पाहिजे. जीवनातल्या छोट्या बाबींचे टेन्शन घेणे अजिबात उपयोगाचे नाही. आपले प्रश्न सोडवण्यासाठी चांगले लोक प्रतिनिधी हवे असतात. रोज एका महीलेबाबत चांगले बोलण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक माहिती आणि भूमिका ठेवा. अडचणीच्या वेळी ११२ क्रमांकावर पोलिसांना संपर्क करा. लागलीच पोलिसांची मदत मिळेल. महिला बँका कमी व्याजाने महिलांना उद्योगाला कर्ज मिळते. बचत गटांची बांधणी करा. शिवसेनेचा धनुष्य बाण असल्याशिवाय आपला विकास होणार नाही.”
यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी पुणे शहरात येत्या काळात महिलांची आरोग्य चिकित्सा शिबिरे घेण्याची सूचना यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांना केली.
यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर,शहर प्रमुख गजानन थरकुडे यांची भाषणे झाली. मनपाच्या लीना कोंढुरकर उद्योग विभागाच्या शैला वानखेडे यांनी महिलांना शासकीय योजना विषयी मार्गदर्शन केले.
या मेळाव्याला शिवसेनेचे संपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, शहरप्रमुख संजय मोरे, शहर प्रमुख गजानन थरकुडे, शहर संघटीका सविता मते मजी नगरसेविका नीता मंजाळकर, शहर समन्वयक छाया भोसले, उमेश वाघ, नगरसेवक राजू पवार, विभाग संघटीका सीमा वरखडे आदी उपस्थित होते.