कॉफी शॉपमध्ये काम करणारा बनला चित्रपट निर्माता; ‘कट्टा’ चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण

Date:

पुणे-( राम शेडगे )

जिद्द आणि कष्ट करायची तयारी असली की माणसाच्या समोर आकाश देखील ठेंगणे होते. असचं एक मूर्तिमंत उदाहरण सचिनचं आहे. ‘कट्टा’ या मराठी चित्रपटाची तो निर्मिती करत असून ड्रीम टॅाकीज या निर्मिती संस्थेचा हा पहिला चित्रपट असणार आहे. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टील तगडी कलाकार मंडळी या चित्रपटात काम करणार आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात एक ‘कट्टा’ असतो. त्या कट्यावर जावून तो स्वत:ला स्वत:मध्ये रमवून घेत असतो. अस प्रत्येक मनाचा ठाव घेणार चित्रपटचं कथानक आहे. या चित्रपटाची  धुरा  ‘सचिन दुबाले – पाटील’ याने स्वत: पेलली आहे.

मुळचा बीडचा असणाऱ्या सचिनच्या किशोर वयातच वडिलांचे छपर हरवले. डोंगरा एवढा आधार अचानक निघून गेल्याने सचिनने गाव सोडले. अन् थेट पुणे गाठलं. बाबा गेलेल्याचे दुख: कवठाळून न बसता तो स्वत: आई, भावासाठी मोठा आधार बनून त्यांना आदर्श जीवन दयाचे.  या ध्येयाने सचिन त्याच्या आयुष्याची मुहूर्त मेढ कॉफी शॉपच्या दुकानात रोवली आणि जीवनाचा श्री गणेशा करून नवीन आयुष्याला सुरवात केली. कॉफी शॉपमध्ये काम करताना सचिनच्या मनात एक विचाराणे ग्रासला होता तो म्हणजे चित्रपटसृस्तीत करिअर करायचं. सचिनचे ध्येय वेगळे असल्याने तो कॉफी शॉपमध्ये जास्त रमला नाही. चित्रपट निर्माते मेघराज राजेभोसले व शशी खंदारे यांच्या संपर्कात तो गेला. आणि खऱ्या अर्थाने त्याने चित्रपट व नाट्यसृष्टीत त्याने पदार्पण केले आणि तो प्रकाश व्यवस्थापनचे काम करू लागला.

नाटकात काम करत असताना दिग्दर्शक नितीन भास्कर व ध्वनी संयोजक राशी बुट्टे यांची ओळख झाली आणि राशी बुट्टे यांच्याकडे सह साउंड रेकॉर्डीस्ट म्हणून काम सुरु केले. सुहासिनी मालिका, प्रसिद्ध चित्रपट बालक – पालक, टाईमपास, टाईमपास २, प्रेम म्हणजे प्रेम असत. अरे आवाज कोणाचा, येलो, योद्धा, कापूस कोंड्याची गोष्ट असे चित्रपट त्याने केले. त्यातच कार्यकारी निर्माते प्रवीण वानखेडे यांची भेट झाली त्यांच्या बरोबर हॉलिवूडची जाहिरात, ‘रानभूल’ चित्रपट केला.

स्वतंत्र निर्मिती व्यवस्थापक म्हणून कामाला सुरवात केली. त्यात ‘याला जीवन ऐसे नाव’, ‘हेडलाईन ‘सल’ हे चित्रपट निर्मिती व्यवस्थापक म्हणून केले. कार्यकारी निर्माता म्हणून त्याचे आगामी चित्रपट ‘आटपाडी नाईटस’, ‘बाजार’, ‘लाडकी लेक’, ‘अॅटमगिरी’, फोकस, जामवंती व हिंदी ‘मेरीट अॅनिमल’ हे चित्रपट आहेत. त्याचा मित्र व कामातील साथीदार विष्णू घोरपडे व तो एक नाट्य निर्मिती देखील करणार आहेत. अशा या हरहुन्नरी सचिनला व त्याच्या नव्या इनिंगला खूप शुभेच्छा.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

तीन हजार लिटर डिझेलऐवजी निव्वळ पाण्याची वाफ: भारताच्या हायड्रोजन रेल्वेची यशोगाथा

मुंबई- दिल्लीजवळील जिंद आणि सोनीपत या स्थानकांदरम्यान 17 जुलै 2026...

भारतीय तटरक्षक दलाने केली पूरग्रस्त भागांत अडकलेल्या 170 जणांची सुटका

मुंबई- भारतीय तटरक्षक दलाने नागरी प्रशासनाच्या निकट समन्वयासह...

डॉ. कुमार सप्तर्षींनी गांधी विचार नव्या पिढीत नेण्याचे काम केले – शरद पवार

गांधींचा विचार वाचवला पाहिजे पुणे: 'महाराष्ट्र गांधी स्मारक निधी' ची...

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोतातडीने सुरू करा,उदघाटनाचा सोहळा नंतर करा-माजी आमदार मोहन जोशी

पुणे : आयटी कर्मचाऱ्यांची गरज लक्षात घेता हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो...