‘विश्‍वातील सामर्थ्‍यशाली स्त्रिया’ : प्रभावशाली चरित्र

Date:

‘विश्‍वातील सामर्थ्‍यशाली स्त्रिया’ हे डॉ. ज्‍योती धर्माधिकारी लिखीत पुस्‍तक वाचनात आलं.  जगातील 11 महिलांचे चरित्र त्‍यांनी सहजसोप्‍या भाषेत शब्‍दबध्‍द केलं आहे.  सुमारे अडीचशे पानांच्‍या या पुस्‍तकाचे प्रकाशक आहेत साकेत प्रकाशन. लेखिका डॉ. धर्माधिकारी या विविध विषयांवर वृत्‍तपत्रांतून प्रासंगिक, चरित्रपर लेखन करीत असतात. या पुस्‍तकासाठी  त्‍यांनी विविध देशांतील मानवतेचा मंत्र देणा-या  11 कर्मयोगिनींची निवड केली आहे.  जागतिक पर्यावरणाचे नेतृत्‍व : डॉ. वंगारी  मथाई (केनिया), राजकर्मी संन्‍यासिनी : आंग सान स्‍यू ची (म्‍यानमार), आधुनिक ‘सावित्रीबाई’ : मलाला युसूफझाई (पाकिस्‍तान), राजकीय शास्त्रज्ञ : डॉ. अँजेला मर्केल (जर्मनी), विज्ञानयोगिनी : डॉ. मेरी क्‍यूरी (पोलंड), मानवता धर्माच्‍या महामेरु : मदर तेरेसा (भारत), वर्णद्वेषाविरुध्‍द एल्‍गार : रोझा पार्क्स (अमेरिका), प्रियदर्शिनी : इंदिरा गांधी (भारत), वृध्‍दांच्‍या सन्‍मानासाठी लढणारी संघर्षव्रती : आयजेन पू (अमेरिका), ‘ओ फॅक्‍टर’ची जादूगार : ओपरा विनफ्रे (अमेरिका), रीडिफायनिंग वुमनहूड : जेनेटमॉक (होनोलुलू)  यांचा त्‍यामध्‍ये समावेश आहे. मानवी  जीवनावर सकारात्‍मक परिणाम करणा-या या कर्मयोगिनींच्‍या जीवनातील वाटचाल, संघर्ष आणि त्‍यांनी मिळवलेले यश वाचतांना वाचक मंत्रमुग्‍ध होऊन जातो. चपखल आणि काव्‍यात्‍मक शीर्षक हे या पुस्‍तकाचे आणखी एक वैशिष्‍ट्य म्‍हणावे लागेल. चरित्रलेखन हा प्रकार वाटतो तितका सोपा नसतो, याची जाणीव असल्यानं लेखिकेनं विविध संदर्भांचा धांडोळा घेतला आहे. व्‍यक्तिचित्र रेखाटतांना त्‍या व्‍यक्‍तीच्‍या संघर्षाचा आलेख तटस्‍थपणे तथापि, अभ्‍यासूवृत्‍तीने मांडला आहे. लेखनानिमित्‍त प्रचंड माहिती  गोळा झालेली असली तरी केवळ सनावळ्यांची जंत्री न देता साहित्यिक मूल्‍य जपत वाचकांना प्रेरणा मिळेल, अशा शब्‍दांत या सर्व कर्मयोगिनींचे चित्र त्‍या उभे करतात. प्रत्‍येक चरित्रलेखांसोबत वाचनभंग होणार नाही अशा छायाचित्रांचाही सुयोग्‍य वापर केलेला आढळून येतो. पुस्‍तक वाचल्‍यानंतर वाचकांच्‍या ज्ञानात निश्चितच भर पडते.

लेखिका डॉ. ज्‍योती  धर्माधिकारी या जालन्‍याच्‍या राष्‍ट्रमाता इंदिरा गांधी  महाविद्यालयात इंग्रजी विभागाच्‍या प्रमुख आहेत.  त्‍यांचे शिक्षण बी. एस्‍सी. (फीजीक्‍स आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स), एम.ए. (इंग्रजी), बी. एड. पीएचडी असून अध्‍यापन कार्याचा सव्‍वीस वर्षांचा अनुभव आहे. औरंगाबादच्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्‍या विद्यापरिषद सदस्‍य असलेल्‍या डॉ. धर्माधिकारी यांचा  ‘प्रिझम’ हा ललित-लेखसंग्रह यापूर्वी  प्रकाशित झाला आहे. महाराष्‍ट्र राज्‍य साहित्‍य आणि संस्‍कृती मंडळाच्‍या नवलेखक अनुदानातून प्रकाशित झालेल्‍या ‘प्रिझम’ला आचार्य भानूकवी राज्‍यस्‍तरीय उत्‍कृष्‍ट वाङमय पुरस्‍कार प्राप्‍त झाला आहे. विविध वृत्‍तपत्रे, दिवाळी अंकांमध्‍ये ललितलेखन, पुस्‍तक परीक्षण, समीक्षण याबरोबरच राष्‍ट्रीय-आंतरराष्‍ट्रीय इंग्रजी परिषदांमध्‍ये संशोधन पत्रिकांचे वाचन, आकाशवाणी व साहित्‍य संमेलनामध्‍ये कथाकथन त्‍या करत असतात. मराठी साहित्‍य आणि साहित्यिकांचा इंग्रजी जगताला परिचय करुन देण्‍याच्‍या उद्देशाने आंतरराष्‍ट्रीय इंग्रजी जर्नल्‍समध्‍येही सातत्‍याने लेखन करत असतात. त्‍यांच्‍या अनेक कथा,कविता प्रसिध्‍द झाल्‍या आहेत.

‘विश्‍वातील सामर्थ्‍यशाली स्त्रिया’ या पुस्‍तकातील सर्व कर्मयोगिनी विशिष्‍ट ध्‍येय घेवून जीवन जगलेल्‍या आहेत.  यशापयशाचे चढउतार त्‍यांनी पाहिले आहेत. लेखिकेने कर्मयोगिनींच्‍या दु:खाचे अवास्‍तव वर्णन कुठेही केलेले नाही तसेच गुणवर्णन करतांना त्‍या वाहवतही गेलेल्‍या नाहीत. कर्मयोगिनींच्‍या व्‍यक्तिमत्‍वावर सहजतेने त्‍या प्रकाश टाकतात.  11 सामर्थ्‍यशाली स्त्रियांपैकी पाच जणींना नोबेल पुरस्‍काराने गौरवण्‍यात आलेले आहे. इतर स्त्रियांनाही विविध पुरस्‍कार प्राप्‍त झालेले आहेत. विविध पुरस्‍कारांपेक्षा त्‍यांचे कार्य कितीतरी पटीने मोठेआहे, हे सर्वांत महत्‍त्‍वाचे म्‍हणावे लागेल.

लेखिकेने म्‍हटल्‍याप्रमाणे गेल्‍या काही दशकांमध्‍ये ज्‍या स्त्रियाआपल्‍या कर्तृत्वामुळे प्रभावशाली ठरल्‍या त्‍यांची जीवनचरित्रे या पुस्‍तकात मांडली आहेत. वैयक्तिक जीवन, समाज, राजकारण आणि एकंदरीतच मानवतावादी विचारांना दिशा देण्‍याचे अतुलनीय कार्य करणा-या सा-याच स्त्रियांचे जीवन प्रेरणादायी आहे. म्‍हणूनच उदात्‍त हेतूने  जगणा-या या स्त्रियांच्‍या वैयक्तिक आयुष्‍याची जडणघडण मराठी वाचकांसाठी उपलब्‍ध करुन दिल्‍याचे समाधान आहे.

स्त्रियांनी आज विविध क्षेत्रांत नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे. तरीही सामाजिक पातळीवरील त्‍यांचा संघर्ष संपलेला दिसून येत नाही. राष्‍ट्रीय, आंतरराष्‍ट्रीय, शहरी, ग्रामीण अशा भौगोलिक पातळीवर त्‍यांना विविध समस्‍यांना सामोरे जावे लागते.  ‘विश्‍वातील सामर्थ्‍यशाली स्त्रिया’ या पुस्‍तकांतील चरित्रवाचनामुळे संघर्षरत महिलांनाच नव्हे तर पुरुषांनाही नवी प्रेरणा मिळेल, असा विश्‍वास वाटतो.

‘विश्‍वातील सामर्थ्‍यशाली स्त्रिया’ / डॉ. ज्‍योती धर्माधिकारी / साकेत प्रकाशन, औरंगाबाद/ पृष्‍ठे 240/ किंमत: 250 रु.   (डॉ. ज्‍योती धर्माधिकारी – मोबाइल 9420224594)

 

(राजेंद्र सरग 9423245456 )

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात 52.42 टक्के मतदान,पहा कुठे किती झाले मतदान…

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज ४१ प्रभागांमध्ये मतदान प्रक्रिया पार...

बोगस व्होटिंग: हडपसरमध्ये दोन हजार लोक पकडल्याची केंद्रीय मंत्र्यांची माहिती

पुणे – पुणेकरांनी मागील निवडणुकीत कारभारी बदलण्याचा स्पष्ट संदेश...

डी.वाय.आकुर्डी, एटीएसएस, व्हीआयटी पुणेचे दमदार विजय

एमआयटी–एडीटी विद्यापीठातील क्रिकेट सामन्यांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसादलोणी काळभोर :एमआयटी...