कर्तव्य फाउंडेशनतर्फे ससून सर्वोपचार रूग्णालयातील रूग्णांना बसण्यासाठी टेबल व खुर्च्या भेट
पुणे-ससून सर्वोपचार रुग्णालयातील त्वचा विभागातील रुग्णांना बसण्यासाठी कर्तव्य फाउंडेशनतर्फे टेबल व खुर्च्या भेट देण्यात आल्या यावेळी समाजसेवा विभागप्रमुख एम.बी.शेळके, माजी नगरसेवक शैलेंद्र बिडकर, फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे, अशोक देशमुख, गणेश शेलार,मनीष ओसवाल,डॉ. बंटी धर्मा, समाजसेवा अधिक्षक संदीप खरात,प्रथमेश गायकवाड, कीरण कांबळे,मोहनीश निकम,कमलेश गोडसे, मोहन नारायणे, सुनील बाथम,महेंद्र गायकवाड,तौसीफ कुरेशी आदी उपस्थित होते.
कर्तव्य फाउंडेशनतर्फे यापूर्वीही ससून रूग्णालयास विविध प्रकारे मदत करण्यात आली असून फाउंडेशनने जपलेल्या सामाजिक बांधिलकीबद्दल समाजसेवा विभागप्रमुख शेळके साहेब यांनी फाउंडेशनचे आभार मानले.