Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

रोटरी क्लब डिस्ट्रीक्ट 3131 यांच्या वतीने ‘जलोत्सव’ (वॉटर फेस्टीव्हल) चे आयोजन

Date:

पुणे : 
 
‘रोटरी क्लब डिस्ट्रीक्ट 3131’ यांच्या वतीने दिनांक 16 मार्च ते 23 मार्च 2017 या सात दिवसीय ‘जलोत्सव’ (वॉटर फेस्टीव्हल) चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ‘रोटरी क्लब ऑफ पुणे हिल साईड’च्या अध्यक्ष प्रतिभा घोरपडे आणि ‘जलोत्सव’ (वॉटर फेस्टीव्हल) चे संयोजक सतीश खाडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 
 
या सात दिवसीय जलोत्सवाचे उदघाटन गुरूवार, दिनांक 16 मार्च रोजी सकाळी 11 वाजता जलक्रांतीचे प्रणेते राजेंद्र सिंह यांच्या हस्ते होणार आहे. ‘श्रमिक पत्रकार भवन’च्या ‘कमिन्स हॉल’, गांजवे चौक रेथे हा कार्यक्रम होईल. 
 
जलोत्सवातील मान्यवरांची मार्गदर्शक व्याख्याने सायंकाळी 5.30 ते 8.30 या वेळात ‘श्रमिक पत्रकार भवन’च्या ‘कमिन्स हॉल’, गांजवे चौक येथे होणार आहेत. 
 
‘रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट 3131’ मधील महिला अध्यक्षांनी एकत्र येऊन या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. शहरी नागरिकांमध्ये जल साक्षरता निर्माण व्हावी, तसेच उद्योग, प्रशासन, धोरण कर्त्यांसाठी, शेतकर्‍यांसाठी, रोटेरियन्ससाठी आणि पुढच्या पिढीसाठी या जलोत्सवाच्या माध्यमातून जल साक्षरता निर्माण होऊन हे कार्य पुढे चालू राहावे या प्रमुख उद्देशाने या ‘फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले असल्याचे ‘फेस्टिव्हल’चे संयोजक सतीश खाडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 
 
या महोत्सवामध्ये अनेक मान्यवर पाणी विषयक विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये ‘शेती व पाणी’, पाणी आणि वैज्ञानिक चमत्कार, ‘पुण्याचे पाणी, पाणी आणि समाज मन’, ‘इंडस्ट्रीमधील पाण्याचा पुनर्वापर’, ‘पाणी आणि विकास’, ‘हवामान बदल आणि पाणी’ या विषयांचा समावेश आहे. 
 
डॉ. राजेंद्र सिंह, पोपटराव पवार (हिवरे बाजार), खा. अ‍ॅड.वंदना चव्हाण, डॉ. सुधीर भोंगळे, डॉ. सुनील पिंपळीकर (एम.आय.टी.महाविद्यालयाचे सिव्हिल इंजिनियर विभागप्रमुख), अभिजित घोरपडे (पत्रकार), विवेक वेलणकर (‘सजग नागरिक मंच’चे अध्यक्ष), व्ही.एम. रानडे (महाराष्ट्र राज्य सिंचन विभागाचे माजी सचिव), पराग करंदीकर (ज्येष्ठ पत्रकार), मिलिंद बोकील (लेखक), विनोद बोधनकर (जल बिरादरी), बी. बी. ठोंबरे (इंडस्ट्रीतील पाणी नियोजनाचे तज्ञ), रावसाहेब बढे (फाऊंडेशनचे भारतीर पातळीचे प्रकल्प समन्वरक), डॉ. दि. मा. मोरे (सिंचन विभागाचे माजी सचिव), प्रदीप आपटे (अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक) आदी मान्यवर ‘जलोत्सव’ (वॉटर फेस्टिव्हल’) मध्ये मार्गदर्शन करतील. 
 
पाणी विषयक क्षेत्रात काम केलेल्या स्वयंसेवी संस्थाचा या फेस्टिव्हलमध्ये गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये WOTR (पुणे), ‘ग्राम गौरव’- पाणी पंचायत (सासवड), ‘जीवित नदी’ (पुणे), ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ (लातूर), ‘नाम फाउंडेशन’ (बीड), ‘जलदिंडी’ (पुणे), ‘जल बिरादरी’ (पुणे), ‘वनराई’ (पुणे), ‘जलसंस्कृती मंडळ’ (औरंगाबाद), ‘द ग्रीन थम्ब’ (पुणे), तसेच सी.एस.आर.धोरणातून कार्यरत ‘ल्यूपीन सिग्नेटा’ आणि ‘सिंडिकेट बँक’ या संस्थांचा समावेश आहे. उल्लेखनीय कार्य करणार्‍या अनेक ‘रोटरी क्लब’ चा सन्मान या सप्ताहात करण्यात येणार आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भिक घालत नाही-PM नरेंद्र मोदी

पाकिस्तानसोबत ५१ तासांच्या युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले -...

ट्रम्प म्हणाले- भारत-पाककडे खूप अण्वस्त्रे, आम्ही अण्वस्त्र युध्द थांबवले

इस्लामाबाद -अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आम्ही दोन...

उद्या दहावी बोर्डाचा निकाल:अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी 1 वाजता पाहता येणार

यंदा परीक्षेला 16 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले ...पुणे-महाराष्ट्र राज्य...

“रेड 2 ने १०० कोटींचा टप्पा पार केला, याबद्दल मी मनापासून आभारी आहे!” – वाणी कपूर

ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘रेड’ चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित सिक्वेल ‘रेड 2’ ने...