Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

ज्येष्ठ पत्रकार व जनसंपर्क व्यावसायिक रुप कर्नानी यांचे निधन

Date:

पुणे, ३ जानेवारी २०१७ : ज्येष्ठ माजी पत्रकार व ‘इन्स्पिरेशन्स पीआर’ या जनसंपर्क संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक रुप कर्नानी (वय ६२) यांचे नुकतेच (३१ डिसेंबर) हृदयविकाराच्या धक्क्याने येथे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी उषा, मुलगी प्रेरणा, तसेच रुप यांचा लहानपणापासून सांभाळ करणारे मामा भगवान खिलनानी (वय ९४) आणि मावशी शकुंतला खिलनानी (वय ९१) असा परिवार आहे.

रुप कर्नानी यांनी बिझनेस इंडिया या नियतकालिकात एक दशक काम केले. त्यानंतर ते बिझनेस टुडे या नियतकालिकाचे सहाय्यक संपादकही राहिले. नंतर त्यांनी ‘इन्स्पिरेशन्स पीआर’ ही स्वतःची जनसंपर्क संस्था स्थापन केली. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. त्यात ‘इंडिया ट्रॅव्हल ॲवॉर्ड फॉर बेस्ट कम्युनिकेटर’ (ऑगस्ट २०१४), ‘रोटरी ॲवॉर्ड फॉर लाईफटाइम अचिव्हमेंट’ (जून २०१४), केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते पीआर कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांचा ‘चाणक्य पुरस्कार’ (मार्च २०१५), ‘रोटरी व्होकेशनल सर्व्हिस ॲवॉर्ड’ २००९ – २०१०, आजीवन योगदान व कल्पक कामगिरीसाठी ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट ॲवॉर्ड’ २०१४ व पीआरसीआय बेस्ट इमर्जिंग पीआरसीआय चॅप्टर पुणे (वर्ष २०१०) यांचा समावेश आहे. रुप कर्नानी हे लेखकही होते. फिरोदिया समूहाचे संस्थापक कै. एच. के. फिरोदिया यांचे चरित्र त्यांनी लिहीले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बँकॉकहून पुण्यात तस्करी:10.3 कोटींचे हायड्रोपोनिक गांजा पकडला-तिघांना अटक

पुणे-डायरेक्टरेट ऑफ कस्टम डिपार्टमेंट (डीआरआय) च्या पुणे, मुंबई शाखेतील...

भारत पाकिस्तानातील शस्त्रसंधीनंतर निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकारने द्यावी.

भारतीय सैन्यदलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी राजीव गांधींच्या बलिदान दिनी...