२ डोस घेतलेल्यांना च मुभा ….
पॉझिटिव्हिटी रेट 7 टक्के झाल्यास कडक निर्बध लावणार असल्याचा इशारा
पुणे : पुण्यातील सर्व दुकाने सर्व दिवशी सकाळपासून रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. हॉटेलही रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर मॉलही उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यानाच मॉलमध्ये प्रवेश मिळणार आहे.
पुण्यातील वीकेंड लॉकडाउनही रद्द करण्यात आला आहे. दुकाने त्यांच्या साप्ताहिक सुट्टी नुसार आठवड्यातून एक दिवस बंद राहतील. दुकाने , हॉटेल पूर्ण वेळ सुरू ठेवण्यास परवानगी दिली असली तरी पॉझिटिव्हिटी रेट 7 टक्के झाल्यास कडक निर्बध लावणार असल्याचा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. ग्रामीण भागात मात्र चार वाजेपर्यंतच दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी आहे. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले परिस्थिती गंभीर असतानाही काही राजकीय प्रश्न राजकारण करतात.
पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील निर्बंधात सूट देत अजित पवारांनी दुकानाच्या वेळा वाढवण्याबरोबरच हॉटेल आणि अन्य आस्थापना यांनाही सूट दिली आहे. पण दोन्ही शहरातील नागरिकांनी नियम न पाळल्यास कडक पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात येतील असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे पुण्यातल्या कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. ठरवलेल्या नियमांचे पालन करायला पाहिजेच. तसेच मास्कचाही वापर करावा असेही ते म्हणाले आहेत.
दुकानांच्या बाबतीत बोलताना पवार म्हणाले, दुकानांचे मालक, सेल्समन यांच्याबद्दल तक्रार येते की मास्क वापरत नाहीत. असं होता कामा नये. कुठलीही चूक होता कामा नये. सहा दिवस 8 पर्यंत दुकानं सुरू राहतील, मालक, सेल्समन यांनी दोन्ही लस घेतलेलेच असले पाहिजे.
सर्व हॉटेल, रेस्टॉरंट सर्व दिवशी ५० टक्केने सुरू राहतील. जलतरण सोडून सगळे गेम सुरू राहतील. त्याठिकाणी सोशल डिस्टंसीग पाळणे गरजेचे आहे. मॉल रात्री 8 पर्यंत सुरू राहतील. दोन्ही लसी घेतलेल्यांनाच आत प्रवेश असेल. दर 15 दिवसात स्टाफचं मेडिकल तपासणी होईल. असेही त्यांनी सांगितले आहे.
शाळांबाबतीत मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मंगळवारी कॅबिनेट मिटिंग मध्ये चर्चा करू. राज्याच्या धार्मिक स्थळाविषयी जो निर्णय घेतला जाईल तोच पुण्याच्याबाबतीतही लागू असेल.
राज्यात कुठेही निर्बंध शिथिल कारण्याबाबतचा निर्णय घेण्यात मला अजिबात हौस नाही. पुण्याबाबत विचारणा होत असताना प्रस्ताव पाठवण्याची काही गरज नाही. मी पालकमंत्री म्ह्णून निर्णय घेण्यास समर्थ आहे. असा खोचक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला आहे.
ज्या ठिकाणी गर्दी जमते तिथे कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहे. त्यामुळे निर्णय घ्यावे लागतात. पण आता कुणी पुण्याचं काही विचारलं तर सांगा पालकमंत्री निर्णय घेतला. असं पवार म्हणाले.
राज्यात निर्बंध शिथिल न झालेल्या जिल्ह्यात पुण्याचाही समावेश होता. पण पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी असताना सूट का मिळत नाही? असा सवाल पुण्यातील व्यापारी आणि लोकप्रतिनिधीनी उपस्थित केला होता. त्यावर महाविकास आघाडीच्या काही मंत्र्यांनी शिथिलता आणण्याबाबत प्रस्ताव पाठ्वल्याचे सांगितले होते. अजितदादांनी अप्रत्यक्षपणे त्यांना सल्ला दिला आहे.
पुण्यात निर्बंध अखेर शिथिल करण्यात आले आहे. पण, मुंबईसाठी वेगळे नियम आणि पुण्यासाठी वेगळे नियम ठेवण्यावरून वाद निर्माण झाला होता. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पुण्यात वाद निर्माण झाला होता. अखेर पुण्यातला वाद सोडवण्यासाठी बैठक घेऊन थेट निर्णय घेतला. पुण्यात दुकानं आता रात्री ८ वाजेपर्यत खुली राहणार आहे. तर हॉटेल १० पर्यंत सुरू राहणार आहे. हा निर्णय घेत असताना अजित पवारांनी आपली रोखठोक भूमिका सुद्धा मांडली.
व्यापाऱ्यांनी असं करायला नको होतं
व्यापाऱ्यांनी हे असं करायला नको होतं. त्यांना माहिती आहे, हे हौसेने आम्ही करत नाही. सरकारचा महसूल बुडतो. पण लोकांचे जीव महत्वाचे आहेत, ज्या ठिकाणी गर्दी जमते तिथे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढते. पुण्यात कोरोनाची लाट आली होती तेव्हा दोनच लॅब आपल्याकडे होत्या. ऑक्सिजन सुद्धा बाहेरून मागावे लागले होते, असंही पवार म्हणाले.
कसे असतील नवीन नियम?
- सर्व दुकाने सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहणार.
- हॉटेल-रेस्टॉरंट्स रात्री 10 वाजेपर्यंत राहणार सुरु.
- मॉल रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहतील.
- मॉल्समध्ये दोन लस घेतलेल्यांनाच प्रवेश.
- पुणेकरांना मास्क वापरणं बंधनकारक राहील.
- हॉटेल चालक आणि दुकानदारांना लसीचे दोन्ही डोस घेणं बंधनकारक.
- पुण्यातील सर्व उद्यानं नियमित वेळेनुसार सुरु राहणार.
- जलतरण तलाव वगळता इतर आऊटडोअर खेळांना परवानगी.
- 7 टक्क्यांच्या पुढे पॉझिटिव्हीटी रेट गेल्यास पुन्हा निर्बंध.