केंद्रातील मोदी सरकारने आणलेले शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे रद्द करा-रमेश बागवे (व्हिडीओ )

Date:

पुणे-मोदी सरकारने देशातील शेतकरी व कामगार यांच्या विरोधात मोठे षडयंत्र रचले आहे.
यासाठी केंद्रातील भाजप सरकारने तीन काळ्या कायद्यांच्या माध्यमातून शेतकरी, शेत मजूर व कामगार यांना उद्योगपतींचे गुलाम बनविण्यासाठी हे कायदे केले आहेत.असा आरोप करत याच्या निषेधार्थ आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली गुलटेकडी मार्केटयार्ड येथे स्व. आण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करण्यात आले.


यावेळी बोलताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘देशाचे पहिले पंतप्रधान पं.
जवाहरलाल नेहरू म्हणाले होते ‘प्रत्येक गोष्ट प्रतिक्षा करू शकते पण शेती नाही.’ भारत देशामध्ये
शेती व शेतकरी यांच्या विरोधात मोदी सरकारने मोठे षडयंत्र रचले आहे. शेतकरी, शेतमजूर व
कामगारांना उद्योगपतींचे गुलाम बनविण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने तीन काळे कायदे केले
आहे. देशातील शेतकरी, शेतमजूर, आडती, कामगार, कर्मचारी व लाखो लोकांचे या विधेयकामुळे
नुकसान होणार असून ते उद्योगपतींचे गुलाम होतील. त्याचप्रमाणे बाजारसमिती व्‍यवस्था
संपुष्टात येताच बाजार समितीमध्ये काम करणारे तसेच या व्‍यवस्थेवर काम करणारे प्रत्यक्ष व
अप्रत्यक्ष अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे. कोरोना
महामारीच्या आडून शेतकऱ्यांवरचे संकट मुठभर उद्योगपतींसाठी संधी म्हणून मोदींनी हा डाव केला असून शेतकरी, शेतमजूर व कामगार हे कधीही विसरणार नाही. त्यामुळे हे तीन काळे कायदे केंद्र सरकारने मागे घेतले नाही तर काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल.’’
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड म्हणाले की, ‘‘देशातील ६२
कोटी शेतकरी व कामगार तसेच २५० पेक्षा अधिक संघटना या काळ्या कायद्याच्या विरोधात
आवाज उठवित आहेत परंतु मोदी सरकार कुंभकर्णाची झोप घेऊन उद्योगपतींसाठी कानाडोळा करीत आहे. ६२ कोटी लोकांच्या जीवनाशी निगडीत हे विधेयक संसदेमध्ये सुरक्षा रक्षक तैनात करून व खासदारांना धक्काबुक्की करून समंत करण्यात आले. नव्‍या कायद्यामुळे APMC म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती ही व्‍यवस्थाच नष्ट होणार आहे. शेती प्रधान असलेल्या या देशामध्ये
८६% शेतकऱ्यांकडे ५ एकर पेक्षा कमी जमिन आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आपला माल जवळच्या
बाजारातच विकावा लागतो कारण वाहतुकीचा खर्च परवडत नाही अशातच बाजार व्‍यवस्था नष्ट झाली तर त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
त्यामुळे या काळ्या कायद्याचा निषेध म्हणून काँग्रेस पक्ष देशभर रस्त्यावर उतरला आहे.’’
यानंतर पुणे महानगरपालिकेचे गटनेते आबा बागुल म्हणाले की, ‘‘शेतकऱ्यांच्या जवळच्या
भागातच बाजारव्‍यवस्था असल्यामुळे योग्य भाव मालाला मिळत होता. केंद्राने हा कायदा करून
उद्योगपतींसाठी नविन पायघड्या घातल्या आहेत. आपल्या व्‍यापारी मित्रांसाठीच मोदी हे देशाचे
पंतप्रधान म्हणून काम करीत आहेत. शेतकरी व कामगारांच्या विरोधात कायदे करून मोदी आपल्या व्‍यापारी मित्रांचे घर भरण्याचे काम करीत आहेत. याचा मी तीव्र निषेध करतो आणि काँग्रेस पक्ष तळागाळातील लोकांसाठी कायमच रस्त्यावर उतरला आहे आणि आताही उतरला आहे.’’
यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, कमल व्‍यवहारे, नगरसेवक अविनाश बागवे, लता राजगुरू,द. स. पोळेकर, राजेंद्र शिरसाट, सुनिल शिंदे, अशोक जैन, सोनाली मारणे,विशाल मलके, प्रकाश पवार, साहिल केदारी, शिलार रतनगिरी, विठ्ठल गायकवाड, ब्लॉक अध्यक्ष रमेश सोनकांबळे, सतिश पवार, सचिन आडेकर, प्रविण करपे, विजय खळदकर, शोएब इनामदार, रमेश सकट, विजय मोहिते, शाबीर खान, शशांक पाटील, सुनिल पंडित, चेतन आगरवाल, प्रशांत सुरसे, राजू साठे, अमजितसिंग मक्कड, किशोर मारणे, अनुसया गायकवाड, सुरेखा खंडागळे, सीमा महाडिक, इंदिरा अहिरे, सुमन इंगवले, राधिका मखामले, कल्पना उनवने, विश्वास दिघे, योगेश भोकरे, हर्षद बोराडे, क्लेमेंट लाजरस, सचिन सावंत, विजय वारभुवन, केतन जाधव, सौरभ अमराळे, राजू गायकवाड, देविदास लोणकर, अकबर मणियार, भरत सुराणा, कृष्णा सोनकांबळे,
नितीन निकम, रावसाहेब खवळे, सुरेश चौधरी, भारत काळे, शंकर पाटील, इमाम हन्नुरे, स्वप्निल
नाईक, विकास चाबुकस्वार, धनंजय धेडे, रूक्मिणीबाई धेडे, रणजित वडागळे, संजय हामदोरे, हलीमा शेख, रामविलास माहेश्वरी आदी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा

महिन्याभरात लोकार्पणासाठी सज्ज व्हावे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश. मुंबई...

इंडिगो-एअर इंडियाने म्हटले – विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली-आगामी काळात विमान प्रवास महाग होऊ शकतो, कारण...

मारुतीचा चौथ्या तिमाहीत नफा 6% नी घटला

मुंबई-ऑटोमोबाइल कंपनी मारुति सुझुकी इंडियाने आर्थिक वर्ष 2025-26 च्या...

अनिल अंबानी समूहाचीआतापर्यंत 19,344 कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई- ED ने अनिल अंबानी ग्रुप (RAAG) च्या 3,034 कोटी...