गोकुळनगर चौकात जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया | प्रमोद नाना भानगिरेंची जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

Date:

पुणे-पाणी टंचाईच्या काळातही पुणे महानगरपालिकेच्या नियोजनातील त्रुटींची मालिका काही थांबायचे नाव घेत नाही. गोकुळनगर चौकात मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाया गेल्याची घटना घडली असून, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी महापालिका प्रशासनावर जोरदार हल्ला चढवला असून, जबाबदार अधिकारी आणि अभियंत्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा २ दिवसांत शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

गेल्या काही दिवसांत पुणे महापालिकेच्या कारभारातील ढिसाळपणा वारंवार समोर आला आहे:

  1. भर पावसात झाडांना टँकरने पाणी घालण्याचा प्रकार
  2. नव्याने डांबरीकरण केलेला रस्ता पावसात खचणे
  3. आता गोकुळनगर चौकात जलवाहिनी फुटून पाण्याची नासाडी

“दिवसाआड पाणीपुरवठा करणारे प्रशासन पाण्याची अशी उधळपट्टी करत असेल, तर नागरिकांनी पाणी कसे वाचवायचे?” असा सवाल भानगिरे यांनी केला.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना प्रमोद नाना भानगिरे म्हणाले, “पुणे महापालिकेच्या बेजबाबदार आणि गलथान कारभाराचा हा आणखी एक पुरावा आहे. पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या पुणेकरांच्या डोक्यावर पाणी आणणाऱ्या या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे.”

“जलवाहिनींच्या देखभाल-दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे सार्वजनिक पैशाची आणि नैसर्गिक साधनसंपत्तीची नासाडी होत आहे. हे आम्ही अजिबात खपवून घेणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.

भानगिरे यांनी प्रशासनाला दोन दिवसांची मुदत देत म्हटले, “या प्रकरणातील संबंधित अधिकारी आणि अभियंत्यांवर तात्काळ कारवाई करा. कारवाई न झाल्यास शिवसेना पुणे शहराच्या वतीने महापालिका मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल. पाण्याची नासाडी करणाऱ्यांना जाब विचारल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.”

.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पार्किंग बंद, बाहेर दुचाकींवर दंड; एरंडवण्यातील व्यावसायिक इमारतीवरून खर्डेकर आक्रमक

पार्किंग तातडीने खुले करण्याची महापालिकेकडे मागणी; तोपर्यंत ग्राहकांच्या दुचाकींवर...

नेपाळ आपत्ती : पुण्यातील आठ जण सुरक्षित

एक महिला मुंबईत सुखरूप पोहोचली; कैलास पर्वत परिसरातील सात...

राज्यस्तरीय बालविकास कार्यशाळेत पुण्याच्या ‘अर्बन95’ प्रवासाचे सादरीकरण

बालक-केंद्रित शहरी नियोजनावर पुणे महापालिकेचा भर; ‘पुणे किड्स फेस्टिव्हल’मध्ये...

देशभरात NEET-PG 2026 परीक्षा संपन्न; जयपूरमधील 2,445 उमेदवारांची 5 सप्टेंबरला पुनर्परीक्षा

2.73 लाख उमेदवारांसाठी 1,111 केंद्रांवर आयोजन; 2.65 लाखांहून अधिक...