मध्यरात्रीनंतर ट्रक अडवून चालकाला मारहाण; ट्रक व रोकड हिसकावून पळालेल्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले

Date:

पुणे | प्रतिनिधी

नवले पुलाकडून कात्रजच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला मध्यरात्रीनंतर अडवून चालकाला मारहाण करत ट्रक व रोकड हिसकावून पळालेल्या चौघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अवघ्या काही वेळात पाठलाग करून अटक केली. या धाडसी कारवाईमुळे मोठा गुन्हा उघडकीस आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (४ जुलै) पहाटे सुमारे २.३० वाजता नवले पुलाकडून कात्रजकडे जाणाऱ्या लेनवर, राजयोग टोयोटा शोरूमसमोर ही घटना घडली. फिर्यादी ट्रक (एमएच-१२ डब्ल्यूएक्स-९९३२) घेऊन जात असताना आरोपींनी वाहन आडवे घालून ट्रक थांबवला. त्यानंतर चालकाच्या बाजूची काच फोडून त्याला ट्रकमधून खाली ओढले व लाकडी बांबूने मारहाण केली. त्याच्या खिशातील १,५०० रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून घेत ट्रक पळवून नेण्याचा प्रयत्न केला.

घटनेनंतर फिर्यादीने तातडीने डायल ११२ वर संपर्क साधला. माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी करून पाठलाग केला आणि काही अंतरावर ट्रकसह चारही आरोपींना ताब्यात घेतले. याप्रकरणी आरोपींविरुद्ध विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी, दागिने चोरी, रोकड चोरी, लूटमार आणि अपघाताचे गुन्हेही दाखल झाले आहेत. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोपानकाका नगर येथील फ्लॅटचे कुलूप तोडून सुमारे ६९ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.

पर्वती परिसरात एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावण्याचा प्रकार, तर पंचमी हॉटेलजवळ पीएमपीएमएल बसमध्ये चढताना एका ज्येष्ठ महिलेच्या हातातील सुमारे १.१० लाख रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या चोरट्यांनी लंपास केल्या. कोथरूडमध्ये घरातून सुमारे दोन लाख रुपयांच्या हिऱ्याच्या अंगठ्या चोरीला गेल्याची नोंद झाली आहे.

याशिवाय, येरवडा परिसरात कारची काच फोडून १.५० लाख रुपयांची रोकड चोरून नेण्यात आली. हडपसरमध्ये भरधाव कारच्या धडकेत एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला असून अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. संबंधित सर्व प्रकरणांचा तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

🟥 घरफोडी करणाऱ्या दोघांना लष्कर पोलिसांकडून अटक

पुणे | प्रतिनिधी एम. जी. रोड, कॅम्प परिसरातील एका कपड्यांच्या...

गोकुळनगर चौकात जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया | प्रमोद नाना भानगिरेंची जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

पुणे-पाणी टंचाईच्या काळातही पुणे महानगरपालिकेच्या नियोजनातील त्रुटींची मालिका काही...

खडकवासला धरणसाखळीत पाणीसाठा ५.७२ टीएमसीवर; ६४६ एमसीएफटी पाण्याची आवक

पुणे | प्रतिनिधी पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत रविवारी...