पुणे- रेमडीसिव्हीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या चौघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे लक्ष्मीकांत विष्णु ढेगळे (वय २१, रा. केअरहॉस्पीटल, लॅब टेक्नीशियन वाघोली पुणे) ,योगेश सेवालाल राठोड (वय २२, रा लोदेवस्ती थेरगांव, पिंपरीचिंचवड पुणे),नानासाहेब वसंत साळवे (वय ३२, रा साईविहार सोसायटी ,केसनंद वाडेबोल्हाई रोड,केसनंद ता हवेली जि पुणे) शुभम सुदाम मुखेकर (वय २३, रा वाघोली बकोरीफाटा ऑक्सी प्रायमोबिल्डींग पुणे) अशी या चौघांची नावे आहेत
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहरातील टोळी गुन्हेगार, बेकायदेशिर धंदे करणारे,अंमली पदार्थ विक्रीचेरॅकेट चालविणारे, लोकांमध्ये दहशत करणारे सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करुन त्यांचे समूळ उच्चाटन करणे तसेच सध्या चालु असलेल्या कोविड-१९ महामारीच्या काळात रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा सारख्या वस्तुंचा काळाबाजार करणारे लोकांवर कडक कारवाई करण्याबाबत आदेश सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना दिले आहेत.दिलेल्या आदेशानुसार दि.२६/४/२०२१ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील अधिकारी व कर्मचारी हे वाघोली परीसरात पेट्रोलींग करीत असताना पोलीस नाईक साहील शेख यांना एक व्यक्ती रेमडीसीव्हीर इंजेक्शन बॉटल केसनंद फाटा बसस्टॉप जवळ सार्वजनिक मोकळया जागेत वाघोली पुणे येथे बेकायदेशीर रित्या विकत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली त्यांनतर सदर बाबत औषध निरीक्षक, अन्न वऔषध प्रशासन पुणे यांना कळविण्यात आले व त्यांनतर बनावट ग्राहक तयार करुन सदर ठिकाणी अन्न वऔषध प्रशासन यांचे मदतीने छापा टाकला असता लक्ष्मीकांत विष्णु ढेगळे व योगेश सेवालाल राठोड हे दोघे रेमडीसिव्हीर इंजेक्शन ०१ नग हे बेकायदेशिररित्या रेमीडेसिव्हीर इंजेक्शनची विक्रीकरीता आपले कब्जात बाळगुन विक्री करीत असताना मिळुन आले त्यांचे कडे अधिक चौकशी करता त्यांनी सदर इंजेक्शन हे नानासाहेब वसंत साळवे व शुभम सुदाम मुखेकर यांचेकडुन मिळाल्याचे सांगीतले त्यांनतर सर्व चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेवूनत्यां चेविरुध्द श्रुतीका कमलसिंग जाधव औषध निरीक्षक ,अन्न व औषध प्रशासन पुणे यांनी भा. द. वि. कलम४२०, परिच्छेद २६ औषध किंमत नियंत्रण आदेश २०१३ सह वाचन कलम ३ (२) (सी) जिवनावश्यक वस्तुंचेअधिनियम १९५५ चे उल्लंघन, दंडनिय कलम ७ (१) (a) (ii), तसेच औषधे व सौदर्य प्रसाधने कायदा १९४०चे कलम १८ (सी) चे उल्लंघन दंडनिय २७ (बी) (ii), कलम १८ ए उल्लंघन, व कलम २२(१)( cca)दंडनिय कलम २८ व २२ (३) प्रमाणे फिर्याद लोणीकंद पोलीस स्टेशन येथे दिल्याने तो गुन्हा रजि. नं.२४५/२०२१ अन्वये नोंद करण्यात आलेला आहे. व चारही आरोपींना अटक करण्यात आलेली असून सदर गुन्हयाचा तपास अमोल गवळी पोलीस उप निरीक्षक अंमली विरोधी पथक २ गुन्हे शाखा, पुणे शहर हे करीत आहेत