पुणे – महापालिका 25 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन खरेदी करणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.दोन ते अडीच महिन्यांपासून पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी फायदेशीर ठरणारे रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. अनेक रुग्णांना वेळेवर इंजेक्शन मिळत नसल्याने त्यांना जीव गमवावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे रासने म्हणाले .
हेमंत रासने पुढे म्हणाले, पालिकेच्या 8 रुग्णालयात १८०० हजार रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी 800 रुग्णांना रेमडीसीवीर इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहेत. मागील चार दिवसांपासून पालिकेच्या रुग्णालयाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून इंजेक्शन मिळाली नाहीत. या पार्श्वभूमीवर तातडीने ही इंजेक्शन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आणखी 25 हजार इंजेक्शन घेण्याची तयारी आहे. राज्य शासनाकडेही यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढत असताना खासगी रुग्णालयातील गरीब गरजू रुग्णांनांही तातडीने इंजेक्शन मोफत इंजेक्शन मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.