मुंबई-पुढील पाच दिवसांत काही भागांत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर मुंबईत आज ( शुक्रवार ८ जुलै ) दुपारपासून रेड अर्लट जारी करण्यात आला आहे. दुपारी एक वाजेपासून पुढचे २४ तास हा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईत रेड अलर्ट
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये आज दुपारी एक वाजल्यापासून पुढे २४ तास रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई मनपाकडून देण्यात आली आहे. तसेच मुंबईकरांनी आपला प्रवास आणि इतर बाबींचे नियोजन करावे. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, आवाहनही मनपाकडून करण्यात आले आहे.