अंध जोडप्यानी लुटला अधिकमासातील धोंड्याचा आनंद व पाहुणचार
पुणे- – चौरंगाभोवती आकर्षक फुलांच्या पाकळ्यांची रांगोळी … सनईचे मंजूळ सूर …आणि सासरंचकडचा आग्रह…अशा वातावरणात विवाहित अंध जोडप्यानी आज दुपारी कस्तुरे चौकातील श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिरात अधिकमासानिमित्त धोंड्याचा आनंद लुटला .
गणेश पेठेतील श्री काळभैरवनाथ तरुण मंडळाने हा अनोखा योग जुळवून आणला. वाघोली येथील लुई ब्रेल अंध अपंग संस्थेतील हि जोडपी होती . आज मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सासरची भूमिका बजावली . त्यांनी आपल्या पाहुणे म्हणून आलेल्या जावयांचा व मुलीचा पारंपरिक व धार्मिक पद्धतीने खास सन्मान केला .
आज दुपारी १२ वाजता या संस्थेतील पांच जोडप्यांचे आगमन झाले . त्यांचे खास स्वागत केल्यानतर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दुपारची आरती करण्यात आली त्यानंतर लुई ब्रेल संस्थेचे संस्थापक श्री अर्जुन कंधारे व त्यांची पत्नी सौ नूतन होळकर , नवनाथ गाडे व त्यांची पत्नी निर्मला , सोमनाथ गायकवाड व त्यांची पत्नी सुमित्रा , योगेश वाघमारे आणि त्यांची पत्नी संगीता व शिवाजी शिंदे आणि त्यांनी त्यांची पत्नी नंदा यांची मंडळाचे कार्यकर्ते व प्रमुख पाहुण्यांनी पूजा केली त्यानंतर पोशाख , साडी चोळी , चांदीच्या जोडव्या ,तांब्याची भांडी , ताट वाटी ,अनारसे ताम्हण निरंजन देऊन खास सन्मान करण्यात आला त्यानंतर आमरस पुरी , भाजीचा भोजनाचा आस्वाद घेण्यात आला . .
याप्रसंगी श्री लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिरीष मोहिते, तुळशीबाग मंडळाचे नितीन पंडित , कुमार रेणुसे , पियुष शाह शाहीर हेमंत मावळे , सामाजिक कार्यकर्ते आंनद सराफ ,व त्यांचा पत्नी कल्याणी सराफ , सौ . विजया पवार , सौ संगीता मावळे आदींच्या हस्ते या अंध जोडप्यांना धोंड्यांचा खास सन्मान करण्यात आला .
या उपक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष चेतन शिवले , उमेश सपकाळ , सागर पवार , विकास शिवले , शिवाजी महाडिक , सुरज आणवेकर , ओंकार सपकाळ आदी कार्यकर्त्यांनी या अनोख्या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले .
या उपक्रमाविषयी बोलतांना लुई ब्रेल संस्थेचे संस्थापक अर्जुन कंधारे म्हणाले कि , हा आमच्या आयुष्यातील वेगळा आनंद आहे , आजपर्यंत अधिकमासानिमित्त धोंड्याचा सन्मान कुणी केला नव्हता . हा योग आमच्या आयुष्यात पहिल्यांदाच येत आहे .