पुणे-कोथरूड परिसरात बुधवारी एक रान गवा फिरताना दिसून आला. रान गवा शिरल्याची माहिती समजताच बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. सध्या सोशल मीडियावर या रानगव्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. व्हिडिओत हा गवा भेदरलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. दरम्यान वनविभागाला या प्रकाराची माहिती देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी गव्याला पकडण्यासाठी कोथरूड परिसरात दाखल झाले आहेत. रानगवा दुपारी साडेअकरा वाजता चपराक च्या कार्यालायाबाहेरून गेल्याची माहिती प्रख्यात लेखक संजय सोनवणी यांनी दिली
महात्मा सोसायटीतील गल्ली नंबर एकमध्ये एका रिकाम्या जागेत हा गवा येऊन थांबला आहे. तत्पूर्वी त्याने दोन घराच्या गेटला धडक दिली.पहाटे पाचच्या सुमारास हा गवा सोसायटीत शिरला. रस्ता चुकल्याने बावरलेला हा गवा जागा शोधत सोसायटीत फिरत होता. कंपाऊंडची भिंत ओलांडून त्याने एका रिकाम्या जागेत प्रवेश केला. त्यामध्ये त्याच्या नाकाला थोडी जखम झाली. महात्मा सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, ”गवा सदृश्य रानटी प्राणी सोसायटीत आल्याची घटना आमच्याकडे प्रथमच घडली आहे. परंतु आमच्याकडे मोर भरपूर आहेत.सकाळी 5.30 वाजता रहिवासी मॉर्निंग वॉकला बाहेर पडले त्यावेळी गवा आल्याचे समजले. सुरवातीला तो रेडा असल्याचे वाटत होते, पण नंतर फोटो बघून तो गवा असल्याचे स्पष्ट झाले. लोकांना पाहून तो बिथरला होता. त्याने सोसायटीतील 1-2 घरांचे गेटही तोडले. सोसायटीचे वॉचमन तो जाईल तसा जाऊन देत त्याचा मागोवा घेत होते. कोथरूड महात्मा सोसायटीचा 172 एकरचा परिसर आहे. एका बाजुला डोंगर आहे त्यामुळे त्याबाजूने आला असल्याचे शक्यता आहे.”दरम्यान कोथरूड पोलीस, अग्निशमन दल, वनविभागाचे अधिकारी येथे घटनास्थळी डक्ट नसल्याने त्याला पकडण्यास उशीर होत आहे. एनडीएच्या जंगलातून हा गवा वाट चुकून येथे आला असावा असा प्राथमिक अंदाज वनक्षधिकारी दिपक पवार यांनी व्यक्त केला आहे.