रमणबागेत पर्यावरणपूरक गणेशोत्सव
पुणे, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेत या वर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आलाा. शाळेतील निसर्ग या विद्यार्थ्याने तयार केलेली शाडूच्या मातीची गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. पर्यावरणपूरक साहित्यातून सजावट करण्यात आली होती. वाहतुकीचल कोंडी टाळण्यासाठी शाळेच्या मैदानावर विसर्जन मिरवणुक काढण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुषमा चव्हाण, मुर्तीकार अभिजीत धोंडफळे यांच्या हस्ते विसर्जन करण्यात आले. मु‘याध्यापिका तिलोत्तमा रेड्डी, उपमु‘याध्यापिका चारुशिला रौंदाळे, पर्यवेक्षक सुनील शिवले, पर्यवेक्षिका रजनी कोलते यांची प्रमुख उपस्थिती होती. सोहळ्याचे कार्याध्यक्ष अजय पराड व उपकार्याध्यक्ष जयश्री रणखांबे यांनी संयोजन केले. माजी मु‘याध्यापक एस. आर. कुलकर्णी, उपमु‘याध्यापिका भागवतबाई यांची उपस्थिती होती.