प्रत्येक सरकारमान्य मोटर स्कूल ला प्रत्येकी तीन लाख रुपयाचे आर्थिक पॅकेज मिळावे-राजू घाटोळे

Date:

पुणे-सर्व मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालक यांचेसाठी covid-19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सरकारमान्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालकांना केंद्र सरकारकडून प्रत्येक सरकारमान्य मोटर स्कूल ला प्रत्येकी तीन लाख रुपयाचे आर्थिक पॅकेज मिळावे अशी मागणी भारताचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांचेकडे केली आहे आपला प्रस्ताव मिळाल्या बद्दल कन्फर्मेशन पीएम ऑफिस कडून आले आहे व व त्याचा संदर्भ क्रमांक सुद्धा मिळाला आहे तसेच आपण भारताचे परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनासुद्धा पॅकेज बाबत मागणी केली आहे तसेच भारताचे अर्थमंत्री  निर्मला सीतारमण यांचेकडे सुद्धा आर्थिक पॅकेज ची मागणी केली आहे अशी माहिती   महाराष्ट्र राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे यांनी कळविली आहे.

परवा दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र  मोदी  यांनी देशाला उद्देशून केलेल्याभाषणामध्ये को रोना च्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी संपूर्ण देशासाठी 20लाख  कोटींचे पॅकेज जाहीर केले त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व सरकारमान्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल करिता

कोरोना मुळे उत्पन्न झालेले परिस्थितीतून मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व छोट्या मोटार ड्रायव्हिंग करिता सध्या त्यांना द्यावे लागणारे ऑफिस चे भाडे प्रशिक्षकांचा पगार गाड्यांचे हप्ते व ड्रायव्हिंग स्कूल ऑफिस कर्मचाऱ्यांचे पगार व अनेक इतर खर्च 50 दिवसाच्या लॉक डाऊन मुळे व्यवसाय बंद असल्यामुळे छोटे ड्रायव्हिंग स्कूल संचालकांना हे खर्च भागवणे आता शक्य होणार नाही आणि म्हणूनच अशा सरकारमान्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल ला केंद्र सरकारकडून एक ड्रायव्हिंग स्कूल वर किमान दहा कुटुंब अवलंबून असतात याचा विचार करून सदर संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येक ड्रायव्हिंग स्कूल ला किमान तीन लाख रुपयाचे आर्थिक पॅकेज केंद्र सरकारकडून करण्यात यावे अशी मागणी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचेकडे व भारताच्या अर्थमंत्री माननीय निर्मला सीतारमण यांचेकडे आपण आर्थिक पॅकेज मागणी करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे हा प्रस्ताव आहे तो जेव्हा मंजूर होईल तेव्हाच आपल्याला प्रत्येकी तीन लाख रुपयाची मदत मिळणं शक्य होणार आहे .आपण पाठवलेल्या प्रस्तावाला प्रधानमंत्री कार्यालय पीएम कडून आपल्या प्रथम मिळाल्याचा संदर्भित क्रमांक सुद्धा मिळाला आहे तसेच अन्य सर्व संबधित मंत्री आणि कार्यालये यांना माहिती व्हावी यासाठी ईमेल द्वारा कळविण्यात आले आहे. असे घाटोळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

US सिनेटमध्ये इराण युद्धाविरोधात प्रस्ताव मंजूर; ट्रम्प यांना लष्करी कारवाई थांबवण्याचे आवाहन

सिनेटच्या ठरावावर ट्रम्प यांची टीका; होर्मुझमधील जहाजांची वर्दळ तिप्पट,...

बरसो रे ..धरण क्षेत्रात ..मेघा..मेघा ….

पुण्यात रात्रभर ‘टिप टिप बरसा’ ; धरणांतील पाणीसाठा वाढीची...

दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळली

सह धर्मादाय आयुक्तांचा महत्त्वपूर्ण आदेश पुणे : कै. सौ. लक्ष्मीबाई...

देवेंद्र फडणविसांची तथाकथित दैवीशक्ती शेतकरी, महिला व तरुणांचे प्रश्न सोडवताना कुठे जाते?

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये काँग्रेसचा शेतकरी मेळावा...