राज ठाकरे यांच्या कुटुंबाकडून चंद्रकांत दादा यांना ‘पुन्हा या’ चे औपचारिक आमंत्रण

Date:

मुंबई-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कृष्णकुंज येथे जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “मनसेचे संस्थापक राज ठाकरे, यांची आणि माझी नाशिकला अचानक भेट झाली. आम्ही दोघेही नाशिक दौऱ्यावर होतो. त्यावेळी आमचं असं बोलणं झालं की, मुंबईत कधीतरी घरी भेटू. ही राज्यातील सर्वांची संस्कृती आहे. पहिला मुद्दा म्हणजे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष हे राज ठाकरेंच्या घरी का गेले? मग त्यांनी त्यांना भाजपाच्या प्रदेश कार्यालयात का नाही बोलावलं?

मूळात मी असा अहंकार माननारा नाही. भाजपाचीच नाही तर राज्याची ही परंपरा आहे, संस्कृती आहे. की कुणीतरी घरी ये म्हटलं तर आपण हो म्हणतो. यामध्ये कोणी कोणकडे जायचं हा मुद्दा नाही.”

चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची परंप्रांतियाबद्दलची भूमिका बदलल्या शिवाय आम्ही युतीसंदर्भात चर्चाही करू शकत नाही, हे अगोदरच स्पष्ट केलेलं आहे. राज ठाकरेंनी मला त्यांच्या भाषणाची एक क्लिप मला पाठली होती. ते उत्तर भारतीयांसमोर त्यांनी केलेलं भाषण उत्तर प्रदेश बिहारमध्ये खूप व्हायरल झालं आणि ते ऐका असं त्यांनी सांगितल्याने मी ते ऐकलं. ते ऐकल्यानंतरही माझ्या मनात काही मुद्दे होते. ते मुद्दे घेऊन आमच्याच चर्चा झाली. त्यामुळे सदिच्छा भेट, राजकीय चर्चा असेल तर ती, युतीची नाही तर एकमेकांच्या भूमिकांसंदर्भातील राजकीय चर्चा झाली.

तसेच, दोन भूमिका कुठल्याही माणसाच्या असतात, एक माणूस म्हणून आणि एक नेता म्हणून. माणूस म्हणून मला त्यांच्या भूमिकेवर चर्चा करायची होती. ज्या काळत मुंबईत मी विद्यार्थी दशेत होतो आणि अभाविपचं काम करायचो त्यावेळे ते भारतीय विद्यार्ती सेनेचं काम करायचे, तेव्हापासूनच माझ्या मनात नेहमी त्यांच्याबद्दल आकर्षण राहिलेलं आहे. त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय चांगलं आहे, केवळ दिसण्यापुरतं नाही तर बोलण्यातील स्पष्टता, आपल्या मुद्दयांवर आग्रही राहणं. त्यामुळे व्यक्ती म्हणून एकमेकांचं सुख पाहणं, यश पाहणं हे आलंच. परंतु त्यांनी मोठ्या भूमिकेतही यायला पाहिजे हे एक माणूस म्हणून त्यांना म्हणणं वेगळं, पण मी भाजपाचा राज्याचा अध्यक्ष आहे. त्या भूमिकेतून आज मनसे व भाजपा एकत्र येऊन निवडणुका लढवण्याचा प्रस्ताव नाही. असंही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

याचबरोबर “प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते, यावर माझा विश्वास आहे. नाहीतर नाशिकला प्रवासाला तेही जातात व मी ही जातो, पण नाशिकमध्ये असं अचानक भेटण्याचं काही कारण नव्हतं. आम्ही काही ठरवून भेटलो नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते. मी मागील वर्षभरापासून बोलतोय, की त्यांनी त्यांची भूमिका बदलली पाहिजे. पण समोरासमोर आलो आम्ही नाशिकला. त्यानंतर आजची वेळ यायची होती.” असंही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवलं.आम्ही निरोप घेताना ‘पुन्हा भेटू’ असं म्हटलो. याला कसलीही राजकीय किनार नव्हती.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसंबंधी काहीही चर्चा झाली नाही. राज ठाकरेंना त्यांची विचार व्यापक करण्यास सांगितलं. त्यांच्या मनात परप्रातियांबाबत कसलीही कटुता नाही. ती भूमिका व्यवस्थितपणे मांडण्यात सांगितलं असल्याचं चंद्रकात पाटील म्हणाले.

संजय राऊतांना चंद्रकांत दादा यांनी दिले ओपन चॅलेंज

दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यांनी खासदार संजय राऊत यांनी मुंबई महापालिका क्षेत्रातील एखादा सुरक्षित वॉर्ड बघून निवडून दाखवावं, इतरांच्या क्षमता बघण्यापेक्षा स्वत:ची क्षमता त्यांनी ओळखावी असं पाटील यांनी म्हटलं आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अखिल हिंदू साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी पुण्यात नियोजन बैठक संपन्न

महाराष्ट्रातून ७० प्रमुख प्रतिनिधींची उपस्थिती ; एप्रिल २०२६ मध्ये...

पुणे मेट्रोमध्ये सुलभ प्रवासासाठी एनपीसीआयने एचडीएफसी बँकेसोबत सहयोगाने ‘रुपे ऑन-द-गो’ कार्ड सादर केले

महा मेट्रो (महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड) आणि एचडीएफसी बँक यांच्‍यामधील सहयोगामुळे लाखो प्रवाशांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळणार पुणे ,: नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ने महा मेट्रो आणि पुणे मेट्रोसाठी विशेष अ‍ॅक्वायरर बँक असलेल्या एचडीएफसी बँकेसोबत सहयोगाने पुणे मेट्रोमध्ये रुपे ऑन-द-गो (ओटीजी) कार्ड स्वीकारण्याची सुविधा सुरू केल्याची आज घोषणा केली. या उपक्रमामुळे प्रवासी त्यांच्या विद्यमान रुपे ऑन-द-गो कार्डचा वापर करून पुणे मेट्रोच्या सर्व कार्यरत स्थानकांवर प्रवास करू शकतात. संपर्करहित आणि इंटरऑपरेबल पेमेंट सोल्यूशन्सद्वारे ही डिजिटल तिकीट यंत्रणा विनासायास आणि सुलभ अनुभव देते. ही सुविधा महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आली. कागदी तिकीट, मोबाइल क्‍यूआर तिकीट, तसेच एचडीएफसी बँक वन पुणे एनसीएमसी रुपे कार्डद्वारे प्रवाशांना सुविधा देणारी पुणे मेट्रो आता ओपन-लूप रुपे ऑन-द-गो स्वीकारण्याच्या सुविधेमुळे अधिक सुधारित प्रवास अनुभव देत आहे. या उपक्रमामुळे कोणतेही विद्यमान किंवा नवीन रुपे ऑन-द-गो कार्ड वापरून अ‍ॅक्वा आणि पर्पल मार्गिकांवरील सर्व २९ कार्यरत स्थानकांवर ‘टॅप अँड ट्रॅव्हल’ करता येणार आहे. ही प्रगती दैनंदिन प्रवाशांना एकसंध, सोयीस्कर आणि विनासायास प्रवासाची सुविधा देणार आहे. यामुळे कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी आणि प्रवासी संपूर्ण नेटवर्कमध्ये एकाच कार्डचा वापर करू शकतील. प्रत्येक प्रवासासाठी किंवा वेगवेगळ्या मेट्रो मार्गिकांसाठी स्वतंत्र तिकीट खरेदी करण्याची गरज न राहिल्याने प्रवास अधिक सोपा होईल. रुपे ऑन-द-गो कार्ड विविध बस आणि मेट्रो सेवांमध्ये इंटरऑपरेबिलिटीला पाठबळ देते, तसेच ऑफलाइन पेमेंटची सुविधाही प्रदान करते, ज्यामुळे कमी नेटवर्क असलेल्या भागांमध्येही प्रवाशांना कोणताही अडथळा येणार नाही. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) श्री. श्रवण हार्डीकर, आयएएस म्हणाले, “पुणे मेट्रोसाठी एनसीएमसी कार्ड इंटरऑपरेबिलिटीची सुरुवात हा खरोखरच एक परिवर्तनकारी टप्पा आहे. माननीय पंतप्रधानांच्या ‘वन नेशन, वन कार्ड’ या संकल्पनेशी सुसंगत असलेला हा उपक्रम प्रवाशांसाठी मेट्रो प्रवास अधिक सुलभ आणि आधुनिक करणार आहे. स्वयंचलित भाडे सवलतींसह सुलभ ‘पे-अ‍ॅज-यू-गो’ अनुभव देऊन आम्ही सार्वजनिक वाहतूक अधिक सुलभ, परवडणारी आणि प्रवासी-अनुकूल बनवत आहोत. या महत्त्वपूर्ण यशासाठी मी संपूर्ण पुणे मेट्रो टीमचे, आमचे भागीदार एचडीएफसी बँक आणि पेक्राफ्ट यांचे, तसेच हे यश शक्य करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करतो. आपल्‍या शहरासाठी आणि देशासाठी विनासायास, स्मार्ट आणि भविष्यासाठी सज्ज वाहतूक परिसंस्था उभारण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.” एनपीसीआयच्या कार्यकारी संचालिका (ग्रोथ) सोहिनी राजोला म्हणाल्या: “पुणे मेट्रोमध्ये 'रुपे ऑन-द-गो' सुरू करणे हे भारतातील शहरी गतिशीलता सुधारण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. पुणेकरांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी एमआयेएचयूए, महा मेट्रो आणि एचडीएफसी बँकेसोबत काम करताना आम्हाला आनंद होत आहे. याद्वारे आम्ही डिजिटल पेमेंटची व्याप्‍ती वाढवून त्‍याला सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवत आहोत.” एचडीएफसी बँकेचे पेमेंट्स आणि डिजिटल बँकिंग चॅनेल प्रमुख श्री. राजनिश परमानंद प्रभू म्हणाले: “आम्ही ग्राहकांना सुलभ, सर्वोत्तम आणि आधुनिक प्लॅटफॉर्मवर आधारित डिजिटल अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहोत. रुपे ऑन-द-गो कार्डमुळे प्रवाशांचा वेळ वाचण्‍यासह प्रवासाचा दर्जाही सुधारेल. पुणे मेट्रोकरिता रूपे ऑन-द-गो कार्डसाठी पेमेंट पार्टनर म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही एनपीसीआय, एमओएचयूए आणि महा मेट्रोचे आभारी आहोत.” पुणे मेट्रोमध्ये रुपे ऑन-द-गो स्वीकारण्यामुळे देशभरातील विविध मेट्रो आणि बस नेटवर्कमध्ये एनसीएमसीचा व्यापक अवलंब वाढण्यास मदत होत आहे. यामुळे भारताचा स्मार्ट मोबिलिटी पायाभूत सुविधांकडे होणारा प्रवास वेगाने पुढे जात असून प्रवाशांना सोपा आणि सातत्यपूर्ण प्रवास अनुभव मिळत आहे. वापरकर्ते केवळ पुण्यातच नव्हे, तर मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद आणि कानपूर यांसारख्या शहरांतील मेट्रो सेवांमध्ये, तसेच मुंबई (B.E.S.T), गुवाहाटी, हरियाणा, जम्मू, श्रीनगर, हिमाचल आणि औरंगाबाद येथील बस सेवांमध्येही रुपे ऑन-द-गो कार्डचा लाभ घेऊ शकतात. रुपे एनसीएमसी कार्ड मिळवण्यासाठी वापरकर्ते सहभागी बँका, मेट्रो स्थानके किंवा नियुक्त कार्यालयांना भेट देऊ शकतात आणि त्यांच्या सुलभ प्रवासाच्या सुरुवातीसाठी प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

टेनिस कोर्ट आणि बास्केट बॉल कोर्ट भूमिपूजन सोहळा संपन्न!

पुणे-येथील महापालिकेच्या प्रभाग क्र. ३०, कर्वेनगर-हिंगणे होम कॉलनी...