‘भीमथडी जत्रे’त ‘अन्नदाता – सेंद्रिय अन्न महोत्सव

Date:

पुणे-२२ ते २५ डिसेंबर २०१७ या कालावधीत कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर भरणाऱ्याभीमथडी जत्रेअन्नदातासेंद्रिय अन्न महोत्सवहे विशेष आकर्षण असणार आहे. याअन्नदातासेंद्रिय अन्न महोत्सवामध्ये एकूण ४१ स्टॉल्स असून, त्यापैकी ३६ स्टॉल्सवर शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतमाल व अन्नधान्य विक्रीसाठी उपलब्ध असेल, तर ५ स्टॉल्सवर सेंद्रिय घटक वापरून तयार केलेले खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध असतील. याशिवाय दिनदर्शिका, वनराई अंक प्रकाशन, जनजागृतीपर प्रदर्शन, व्याख्याने, चर्चासत्रे यांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘भीमथडी जत्रेमध्ये सेंद्रिय अन्नपदार्थांचा प्रसार करणारा अशा प्रकारचा अन्न महोत्सव पहिल्यांदाच भरत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार दि. २२ डिसेंबर रोजी भीमथडी जत्रेच्या स्थळी सकाळी ११ वाजता आदिवासी सेंद्रिय शेतकरी राहीबाई पोपेरे (भीमाशंकर) यांच्या हस्ते होणार आहे. राहीबाई पोपरे या पिढीजात सेंद्रिय शेतकरी असून त्यांनी १५० हून अधिक गावरान बियाणांची पेढी तयार केली आहे.

पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, येरवडा कारागृह अधीक्षक स्वाती साठे, सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमाताई तावरे, साताऱ्याच्या वेदांतिका राजेभोसले, भीमथडी जत्रेच्या संयोजिका सुनंदाताई पवार प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असतील. वनराई संस्थेचा सुरक्षित अन्नशेतापासून ताटापर्यंतहा विशेषांक आणि ऋतूमानानुसार आहार व जीवनशैलीची माहिती देणारी आकर्षक रंगीत (२०१८ची) दिनदर्शिका यांचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटनप्रसंगी केले जाईल. ही दिनदर्शिका अंक या महोत्सवामध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. वनराई, पूर्ण पुणे, वसुंधरा स्वच्छता अभियान, ग्रामगौरव प्रतिष्ठान, सस्टेनेबल लिव्हिंग स्टोअर आदींच्या संयुक्त प्रयत्नांतून अन्नदातासेंद्रिय अन्न महोत्सवआकारास आला आहे. सेंद्रिय शेती चळवळीचा प्रचारप्रसार करणारे पुणे शहर व जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते यात सक्रीय सहभागी झालेले आहेत. हा अन्नदाता सेंद्रिय अन्नमहोत्सव दि. २२ ते २५ डिसेंबर २०१७ या कालावधीत सकाळी १० ते रात्री १० या वेळेत सुरु राहणार आहे.

रसायनमुक्त, भेसळमुक्त, विषमुक्त व सुरक्षित अशा सेंद्रिय अन्नधान्याचा अधिकाधिक प्रचारप्रसार व्हावा आणि हे सेंद्रिय अन्नपदार्थ शेतकऱ्यांकडून ग्राहकांना थेट व सुलभतेने उपलब्ध व्हावेत हा हेतू या अन्नदातासेंद्रिय अन्न महोत्सवाच्या केंद्रस्थानी आहे. सेंद्रिय शेती करणाऱ्या ३६ शेतकरी गटांचे स्टॉल्स या अन्नमहोत्सवात असतील. या स्टॉल्सवर सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला शेतमाल जसे की कडधान्ये, डाळी, भरडधान्ये, हातसडीचा तांदूळ, खपली गहू, लाकडी घाण्याचे तेल, जवस, सेंद्रिय गुळ, सैंधव मीठ, तरोटा कॉफी, अंबाडीपासून केलेली विविध उत्पादने, हळद, मसाले अशा सुमारे ४५ अन्नधान्य वस्तूंचा समावेश असेल. या सर्व अन्नधान्यांची इथे रास्त दरात विक्री होणार आहे.    पुणेकरांना खाद्यपर्वणी असणाऱ्या या अन्नदाता सेंद्रिय अन्न महोत्सवात ५ स्टॉल्सवर हळद, मीठमिरचीपासून भाजीपाला व धान्यापर्यंत सर्व सेंद्रिय घटक वापरून शिजवलेले गरमागरम अतिशय रुचकर अन्नपदार्थ खवय्यांसाठी उपलब्ध असतील, जेणेकरून ग्राहकाला सेंद्रिय अन्नाची प्रत्यक्ष अनुभूती घेता येईल. यामध्ये विविध प्रकारच्या भाकऱ्या, हुरड्याचा बटाटावडा, तुरीचा पुलाव, तुरीच्या शेंगांची आमटी, मोदक आंबेडाळ, कोकणीवडे, हुलगा भाजी, हातसडीचा भात व उडदाची आमटी अशा खाद्यपदार्थांचा समावेश आहे.

नागरिकांमध्ये अन्न, आहार, आरोग्य आणि पर्यावरण याविषयी जागरूकता घडवून आणण्यासाठी सुरक्षित अन्न, अन्न हेच औषध, पारंपरिक अन्नधान्यांचे आहारातील महत्व, गच्चीवरील बाग अशा विविध विषयांवर तज्ञांची व्याख्याने व मार्गदर्शनपर चर्चासत्रांचे आयोजन या महोत्सवाच्या काळात होणार आहे. तसेच सुरक्षित अन्न आणि शाश्वत जीवनशैलीचे महत्त्व विशद करणारे भव्य प्रदर्शनही येथे मांडण्यात येणार आहे. भीमथडी जत्रेचे प्रवेश शुल्क (केवळ रु. ३०) भरून अन्नदातासेंद्रिय महोत्सवाच्या दालनात नागरिकांना विनामूल्य प्रवेश मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे सुरक्षित अन्नाविषयीचे प्रदर्शन, व्याख्याने व चर्चासत्रे यांचा लाभ घेण्यासाठी भीमथडीच्या प्रवेशशुल्काशिवाय कोणतेही अतिरिक्त शुल्क देण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिकांनी या अन्नदातासेंद्रिय महोत्सवाला भेट द्यावी आणि आपले अन्न, आहार व आरोग्य याविषयी जागृत व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

            ज्या नागरिकांना शुद्ध व सात्विक असे सेंद्रिय अन्नधान्य हवे असेल त्यांनी www.organicannadata.comया वेबसाईटला भेट द्यावी. या वेबसाईटवर सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे आणि विक्रेत्यांचे संपर्क पत्ते व फोन क्रमांक उपलब्ध आहेत. नागरिकांनी या अन्नमहोत्सवात संपूर्ण चार दिवस सहकुटुंब यावे, खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यावा आणि सेंद्रिय शेतीतून तयार झालेले उत्तम दर्जाचे धान्य, डाळी, फळे इत्यादींची खरेदी करावी, तसेच येथून पुढे सातत्त्याने सेंद्रिय पदार्थांचा आग्रह धरावा व या लोकचळवळीचे घटक व्हावे असे आवाहन आयोजकांनी याप्रसंगी केले आहे. तसेच अन्नदाता सेंद्रिय अन्न महोत्सव भीमथडी जत्रेमध्ये आयोजित करण्यास भीमथडी जत्रेच्या संयोजिका आणि बारामती एग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांनी केलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल अन्नदाताच्या संयोजकांनी विशेष आभार व्यक्त केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रांगोळ्यातून उलगडले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य 

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

हडपसरमध्ये रक्ताच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांना नवी दिशा: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी ऑटोलॉगसस्टेमसेल प्रत्यारोपण

नियमित आरोग्य तपासणीतून रक्ताच्या कर्करोगाचे निदान; मेकॅनिकल इंजिनिअरने केली कर्करोगावर यशस्वी मात पुणे, 26 जून 2026: हडपसर येथे राहणारे 46 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर ऋतिक मेहरा यांच्यासाठी जानेवारी 2026 मधील नियमित वार्षिक आरोग्य तपासणी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कोणतीही लक्षणे नसताना आणि नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच त्यांच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत त्यांना IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा या अस्थिमज्जेतील प्लाझ्मा पेशींमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा हा प्लाझ्मा पेशींचा (Plasma Cells) एक प्रकारचा कर्करोग आहे, ज्यामध्ये शरीरातील असामान्य प्लाझ्मा पेशी लॅम्बडा लाईट चेन (Lambda Light Chain) नावाचे मोनोक्लोनल प्रोटीन जास्त प्रमाणात तयार करतात। सामान्यतः आपल्या शरीरातील प्लाझ्मा पेशी संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवतात, परंतु या आजारात त्या निकामी आणि हानिकारक प्रोटीन्स बनवू लागतात.  "उपचारांपेक्षा कर्करोगाचे निदान स्वीकारणे माझ्यासाठी अधिक कठीण होते," असे ऋतिक मेहरा यांनी सांगितले. "मी पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत होतो आणि मला कोणतीही लक्षणे नव्हती. नियमित आरोग्य तपासणीतून अचानक कर्करोग झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसला. मात्र माझ्या पत्नीने संपूर्ण काळात मला सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. उपचार आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाची प्रक्रिया माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुरळीत झाली आणि आता मी हळूहळू माझ्या दैनंदिन आयुष्यात परतत आहे." निदानानंतर ऋतिक यांनी केमोथेरपीच्या तीन सायकल्स पूर्ण केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत रुग्णाच्याच स्टेम सेल्सचा वापर करून उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर रक्तपेशींची निर्मिती पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.  त्यांना 15 मे 2026 रोजी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर – मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर, पूर्वी संकलित केलेले त्यांचे स्टेम सेल्स 16 मे 2026 रोजी पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि उत्कृष्ट प्रकृतीसह त्यांना 2 जून 2026 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाविषयी बोलताना डॉ. चंद्रकांत लहाणे, सल्लागार हिमॅटॉलॉजिस्ट व हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, म्हणाले, "मल्टिपल मायलोमा हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीमुळे या रुग्णामध्ये आजाराचे लवकर निदान होऊ शकले. पात्र रुग्णांमध्ये ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण हा मल्टिपल मायलोमावरील अत्यंत प्रभावी उपचार पर्याय असून, यामुळे दीर्घकालीन चांगले परिणाम आणि अधिक सखोल रेमिशन मिळण्यास मदत होते." ही केस रुग्णालयासाठीही महत्त्वपूर्ण ठरली असून, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हडपसर, मगरपट्टा, खराडी, वानवडी, हांडेवाडी, सासवड, बारामती, अकलूज, सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक रक्ताच्या कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. इंडियन सोसायटी फॉर ब्लड अँड मॅरो ट्रान्सप्लांटेशन (ISBMT) च्या माहितीनुसार, भारतात 1983 ते 2022 या कालावधीत 26,843 बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. मात्र, दरवर्षी सुमारे 39,000 रुग्णांना या उपचारांची आवश्यकता असतानाही प्रत्यक्षात केवळ सुमारे 2,000 प्रत्यारोपणेच केली जातात. या सेवांच्या विस्ताराविषयी बोलताना डॉ. शशिकांत आपटे, संचालक – हिमॅटॉलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड, म्हणाले, "अधिकाधिक रुग्णांना त्यांच्या घराजवळ वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रादेशिक स्टेम सेल प्रत्यारोपण केंद्रे बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. हडपसर येथे ही सेवा सुरू होणे हे अत्याधुनिक हिमॅटॉलॉजी उपचार अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे." श्री. सगीर सिद्दीकी, प्रादेशिक संचालक – पश्चिम विभाग, मणिपाल हॉस्पिटल्स, म्हणाले,...

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....