पुणे-कात्रज मध्ये मनसे च्या वसंत मोरेंनी राष्ट्रध्वज लावून मिळवलेली प्रसिद्धी अजूनही कायम असताना आता भाजपच्या हेमंत रासनेंनी शनवार वाड्याच्या प्रांगणात १५० फुट उंचीचा राष्ट्रध्वज लावल्याने … यापुढे आणखी कोणी त्याचे आचरण केल्यास नवल वाटू नये … अशी स्थिती असताना या राष्ट्रध्वज उभारणीच्या उद्घाटनप्रसंगी विशेष म्हणजे महापौर आणि पालकमंत्री यांच्यात पुण्याच्या विकासावरून जुगलबंदी रंगल्याचे दिसून आले आहे .
शनिवारवाड्याच्या प्रांगणात आज सकाळी 150 फूट उंचीच्या राष्ट्रध्वजाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर प्रशांत जगताप म्हणाले की, राजकीय जोडे बाजूला ठेवून पुण्याच्या विकासासाठी काम करणे गरजेचे आहे. असा टोला पालकमंत्र्याचे नाव न घेता लगवला. त्यांच्या विधानामुळे पालकमंत्री गिरीश बापट हे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला महापौराच्या विधानाचा त्यांच्या खास शैलीत समाचार घेत. आम्ही राजकीय जोडे घालत नाही. पुण्याच्या विकासासाठी काम करत असल्याचे सांगताच उपस्थितांनी त्यांच्या विधानाला टाळया वाजून दाद दिली. मात्र, या कार्यक्रमामुळे पालकमंत्री विरुध्द महापौर असे चित्र पाहायला मिळाले.यावेळी महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी आलगुडे, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप,भाजप गटनेते गणेश बिडकर, स्थानिक नगरसेवक हेमंत रासने आणि मुक्ता टिळक हे उपस्थित होते.
पुण्याच्या पाणीपुरवठा संदर्भात .मेट्रो संदर्भात महापौर आणि पालकमंत्री यांची नेहमीच होत आलेली राजकीय चढाओढ सर्वश्रुत आहेच .