पुणे, दि. 14 : विद्यापीठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सावित्रीबाई फुले
पुणे विद्यापीठ व महाशक्ती प्रतिष्ठान यांच्यावतीने शनिवार, 17 डिसेंबर, 2016 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3
या कालावधीत पुणे विद्यार्थीगृह इंजिनिअरींग कॉलेज व मुक्तांगण स्कूल, विद्यानगर, शिवदर्शन पर्वती, पुणे येथे
रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये पुणे जिल्ह्यातील नामवंत कंपन्या
उपस्थित राहणार आहेत. इयत्ता दहावी,बारावी उत्तीर्ण व कोणत्याही शाखेचा पदवीधर, आय.टी.आय.,
इंजिनिअरींग पदवीधर व पदवीकाधारक अशा सर्व उमेदवारांना या रोजगार मेळाव्याचा लाभ घेता येईल.
मेळाव्यास उपस्थित राहताना उमेदवारांनी आपले सी.व्ही, फोटो व शैक्षणिक कागदपत्रे सोबत आणवी.
एम्प्लॉमेंन्ट कार्यालयाकडे नांव नोंदणी नसलेल्या उमेदवारांनादेखील या संधीचा लाभ घेता येईल, असे आवाहन
सहाय्यक संचालक, विद्यापीठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, पुणे यांनी
प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.