पुणे- हवेत वावरणाऱ्या आणि जुन्या शिवसैनिकांना दुर्लक्षित करू पाहणाऱ्या शिवसेनेला आज माजी खासदार गजानन बाबर यांनी दणका दिला . जुने जाणते नेते अशी प्रतिमा असलेले बाबर शिवसेनेचे मावळ लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार आहेत . आज (बुधवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यामुळे आता केवळ मंत्री विजयबाप्पू शिवतारे हेच एकमेव धडाडीचे नेते उरले आहेत .
गजानन बाबर शिवसेनेच्या तिकिटावर पिंपरी महापालिकेत तीन वेळेस नगरसेवक म्हणून तर दोन वेळेस हवेली विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले होते. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत ते मावळ लोकसभा मतदार संघातून शिवसेनेच्या तिटिकावर खासदार म्हणून निवडून आले होते
यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, आमदार लक्ष्मण जगताप, खासदार संजय काकडे, सूरज बाबर आदी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत बंडाचे निशाण फडकाविल्याने पक्षातून हकालपट्टी झालेले शिवसेनेतील ज्येष्ठ नेते, माजी खासदार गजानन बाबर यांना झाले गेले विसरून त्यांना पुन्हा शिवसेनेत प्रवेश द्यावा म्हणून आजवर वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू होते.