विद्युत सुरक्षेच्या प्रबोधनाची प्रक्रिया निरंतर ठेवणे आवश्यक

Date:

महावितरणचे अध्यक्ष श्री. संजीव कुमार यांचे प्रतिपादन

पुणे : राज्यातील विद्युत अपघातांच्या प्रकारांचे व ठिकाणांचे विश्लेषण करून तेथील नागरिकांना व कर्मचार्‍यांना सुरक्षा संदेश देण्यात यावे. तसेच विद्युत सुरक्षेच्या प्रबोधनाची प्रक्रिया वर्षभर निरंतर सुरु ठेवावी व विद्युत अपघात टाळावेत, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी मंगळवारी (दि. 17) केले.

राज्य शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाकडून आयोजित विद्युत सुरक्षा सप्ताहाचा राज्यस्तरीय समारोप फातिमानगरमधील महात्मा फुले सांस्कृतिक भवनात झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. संजीव कुमार बोलत होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे, राज्याचे मुख्य विद्युत निरीक्षक श्री. सुहास बागडे तसेच श्री. विजय चौरे, श्री. अरुण अवघड पाटील, श्री. गणेश फुलारी, श्री. चंद्गकांत ब्रिद, श्री. रवींद्ग देशमुख, श्री. दिनेशकुमार ओहोळ, श्री. सुनील बोरसेयांची उपस्थिती होती.

श्री. संजीव कुमार म्हणाले, की राज्यातील विद्युत अपघातांच्या प्रकारांचे व त्यामागील नेमक्या कारणांचे विश्लेषण केले पाहिजे. कोणत्या ठिकाणी जास्त अपघात होतात. तेथील सामाजिक वर्ग कोणता आहे. कोणत्या प्रकारच्या औद्योगिक कंपन्यांमध्ये किंवा घरांमध्ये अपघात जास्त होतात हे शोधून काढले पाहिजे. त्यानंतर त्या ठिकाणी जाऊन विद्युत सुरक्षेबाबत प्रबोधन करण्याची काळजी घेतली पाहिजे. ज्या ठिकाणी ज्या प्रकारच्या विद्युत सुरक्षा संदेशांची गरज आहे तेच नेमकेपणाने तिथे सांगितले गेले पाहिजे. याबाबत वीज कंपन्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन श्री. संजीव कुमार यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य विद्युत निरीक्षक श्री. सुहास बागडे यांनी केले. ते म्हणाले, विद्युत अपघात होतात त्यामागे विद्युत सुरक्षेबाबतचे अज्ञान किंवा दुर्लक्ष सर्वाधिक कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्युत सुरक्षेचे प्रबोधन, जनजागरण अतिशय महत्वाचे झाले आहे. महावितरणकडून जानेवारी 2017 च्या वीजदेयकांमध्ये विद्युत सुरक्षेबाबत प्रबोधनात्मक माहिती प्रसिद्ध होणार आहे. सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांनी त्यानुसार विद्युत सुरक्षेसाठी सावधगिरी बाळगावी असे आवाहन श्री. सुहास बागडे यांनी केले.

विद्युत निरीक्षण मंडलाचे अधीक्षक अभियंता श्री. एस. आर. नलावडे यांनी विद्युत सुरक्षा सप्ताहातील विविध उपक्रमांची माहिती दिली तर प्रमुख पाहुण्यांसह विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात विद्युत सुरक्षा सप्ताहात सक्रीय योगदान देणार्‍या कंपन्या व संघटनांच्या प्रतिनिधींना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन श्री. भूषण इनामदार यांनी केले तर विद्युत विद्युत निरीक्षक श्री. एन. आय. पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महावितरणचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे (पुणे), श्री. नागनाथ इरवाडकर (बारामती), श्री. जितेंद्ग सोनवणे (प्रभारी, कोल्हापूर), विद्युत निरीक्षण मंडलाचे अधीक्षक अभियंता श्री. डी. एस. खोंडे (नागपूर), श्री. व्ही. व्ही. नागदेव (औरंगाबाद), ‘कमिन्स’चे श्री. शैलेश हट्टी, टाटा मोटर्सचे मनोज बडवे, ‘मर्सिडिज बेन्ज’चे गणेश दळवी आदींसह विविध औद्योगिक कंपन्या, संघटनांचे प्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ नागरिकाची १०.७४ कोटींची फसवणूक; फरार आरोपी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून घातली होती भीती; आरोपी रोहन...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा व परवानगी उपलब्ध करून द्यावी – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे-पुण्याची ऐतिहासिक व वैभवशाली गणेशोत्सव परंपरा जपणाऱ्या ढोल-ताशा पथकांना...

लघु नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पुण्यात प्रादेशिक कार्यशाळा

‘Small River Rejuvenation Framework’वर तज्ज्ञांचे मंथन; आयुक्त नवल किशोर...

कात्रज-कोंढवा रस्ता, गंगाधाम उड्डाणपूल आणि नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडच्या कामांना गती

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष पाहणी; भूसंपादन,...