Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

श्रीमंत दगडूशेठ चा कळस काढताना एक कामगार कोसळला (व्हिडीओ)

Date:

पुणे-विसर्जन मिरवणुकीसाठी तयारी सुरु आहे. हीच तयारी करत असताना परवा पहाटे तीन वाजता दगडूशेठ गणेश मंडळाच्या मंडपाचा कळस काढत असताना एक कामगार  खाली कोसळून  गंभीर जखमी झाला.
राम जाधव (वय.22) असे कामगाराचे नाव असून तो क्रेन कामगार म्हणून क्रेनवर काम करतो. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याच्या सर्व उपचाराचा खर्च दगडूशेट गणेश मंडळाकडून करण्यात येणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
दगडूशेठ गणपतीच्या मुख्य उत्सव मंडपाच्या देखाव्यात तीन कळस आहे.त्यातील दत्त मंदिरच्या बाजूस असलेला कळस क्रेनच्या साहायाने काढण्याचे काम सुरु होते. त्यावेळी राम जाधव हा कळसाजवळ उभा होता. मंडपाचा कळस काढत असताना दोरी पायात अडकल्याने त्याचा तोल गेल्याने कळसावरुन खाली पडून गंभीर जखमी झाला.
विसर्जन मिरवणूकीसाठी आता मंडळे मंडप काढून मिरवणुक रथांची तयारी करत आहेत. त्या प्रमाणे कालपासूनच दगडूशेट हलवाई गणपतीचाही मंडप काढण्यात येत आहे. यावेळी क्रेनच्या सहाय्याने मंडपाचा कळस उचलला असता तेथे काम करणा-या कामगाराचा तोल गेला व मंडपाच्या छतावरुन थेट खाली कोसळला. यावेळी त्याने हेल्मेट किंवा इतर कोणतेच सुरक्षा  साधने न घातल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेचा व्हिडीओ आज सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी फरसखाना पोलीस तपास करीत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अहमदाबाद विमान अपघातामुळे काँग्रेसचे मतचोरी विरोधातील मशाल मोर्चे १५ जून पर्यंत स्थगित

गडचिरोली/मुंबई दि १२ जून २५नरेंद्र मोदी हे ११ वर्षापासून...

बाळासाहेब दाभेकर यांच्या वाढदिवसा निमित्त सदानंद मोरे यांच्या हस्ते सत्कार अन रक्तदान शिबीर संपन्न.

पुणे (दि.१२) -सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दाभेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने...

जिल्हा परिषदेच्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमाचा १४ जून रोजी शुभारंभ

पुणे, दि. १२ : पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षण...