पुणे-गणेशोत्सवाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातील वैभवशाली मिरवणुकीला सकाळी साडेदहा वाजता सुरुवात झाली .दुपारी अडीच वाजता अलका चौकात या मंडळाचे पहिले पथक पोहोचले .आणि 3 वाजून १० मिनिटांनी प्रत्यक्षात गणेश मूर्तीची पालखी पोहोचली . यावेळी महापौर मुक्ता टिळक भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले,आणि नगरसेविका सरस्वती शेडगे या कसबा गणपती समोरच्या पथकांचे स्वागत करण्यासाठी व्यासपीठावरून खाली गेल्या तेव्हा कातकरी बडगी नृत्यात त्या दोघी आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या . योगेश गोगावले आणि नगरसेवक सम्राट थोरात हि यावेळी उपस्थित होते. पहा या उत्साही नृत्याची झलक …